मुंबई,19 डिसेंबर: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून कंगनाने अनेक विषयावर आपलं मत मांडत असते. राजकारणी (Politician) असो किंवा बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी कंगना कुणाबरोबरही पंगा घ्यायला घाबरत नाही. पण यावेळी मात्र चक्क तिला तिच्या वहिनीनेच रडवलं आहे.
काही दिवसांपूर्वीच कंगनाचा भाऊ अक्षित रणौत ऋतूबरोबर लग्नबंधनात अडकला. कंगनाची वहिनी ऋतू पेशाने डॉक्टर आहे. अक्षित आणि ऋतूच्या लग्न सोहळ्याचे फोटो कंगनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. कंगना म्हणते, तिची वहिनी फक्त एक डॉक्टरच नाही तर एक उत्तम गृहिणीनी (House Wife) आहे. ती तिच्या जबाबदाऱ्या अगदी चोख पार पडते. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तिची वहिनी 'मक्के की रोटी' बनवताना दिसत आहे.
Awww just received an endearing video of my newly married Bhabhi, trying to make makki ki roti, she is a doctor hugely accomplished young independent woman yet she is so rooted, in this video she reminds me of my mom when she was young. Tears of happiness ❤️ pic.twitter.com/cfySO9Ekpu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 18, 2020
कंगनाला तिच्या वहिनीला 'मक्के की रोटी' अर्थात मक्याची भाकरी बनवताना पाहून तिच्या आईची आठवण झाली आहे. त्यामुळेच तिला काहीसं रडू देखील आलं आहे. कंगनाने याला 'आनंदाश्रू' म्हणून संबोधलं आहे.
(हे वाचा-LIC Money Back Plan: रोज 160 रुपयांची बचत करून व्हा 23 लाख रुपयांचे मालक)
कंगनाच्या कुटुंबात तिचे आई वडील, बहीण रंगोली रणौत (Rangoli Ranaut), भाऊ अक्षित रणौत (Akshit Ranaut) आणि वाहिनी ऋतू असा छोटासा परिवार आहे. तिच्या कुटुंबाबाबत कंगना नेहमीच सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत असते.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, कंगना लवकरच 'थलायवी' (Thalaivi) या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा जयललिता (Jayalalitha) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटातील तिच्या लुकबाबत सध्या जोरदार चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Kangana ranaut, Social media, Social media viral