मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून कंगना रणौत झाली स्तब्ध; या अभिनेत्रीवर केला कौतुकाचा वर्षाव

‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून कंगना रणौत झाली स्तब्ध; या अभिनेत्रीवर केला कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut)  ट्रेलरचं कौतुक करत साउथ स्टार अभिनेत्री समंथा अक्कीनेनीची (Samantha Akkineni)  स्तुती केली आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 20 मे: अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Vajpayi) यांची बहूचर्चित वेबसीरिज ‘द फॅमिली मॅनचा’ (The Family Man 2) दुसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर नुतकच याचं ट्रेलर लाँच करण्यात आलं. या ट्रेलरला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता चक्क अभिनेत्री कंगना राणौतनेही (Kangana Ranaut) या ट्रेलरचं कौतुक करत साउथ स्टार अभिनेत्री समंथा अक्कीनेनीची (Samantha Akkineni)  स्तुती केली आहे.

कंगना सध्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर फार सक्रिय असते. इन्स्टाग्राम स्टोरीज वर तिची मतं ती मांडत असते. आता तिने ‘द फॅमिलि मॅन 2’ च्या ट्रेलरची स्तुती केली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत तिने लिहिलं आहे ‘या मुलीने माझं मन जिंकलं’. यात तिने अभिनेत्री समंथा अक्किनेनीचं कौतुक केलं आहे. तर या स्क्रिनशॉट मध्ये तिने समंथाचाच फोटो ठेवला आहे. ज्यात सबटायटल मध्ये लिहिलं आहे, ‘आय व्हिल किल देम.’

कंगनाच्या या स्तुतीवर समंथानेही उत्तर देत कंगना ला धन्यवाद केलं आहे. याआधीही कंगनाने साउथ स्टार समंथाची स्तुती केली होती. तर ‘एपिटोम ऑफ वुमेन एम्पॉव्हरमेंट’ असं तिने म्हटलं होतं. समंथानेही कंगनाच्या आगामी ‘थलायव्ही’ (Thalaivi) चित्रटाची स्तुती केली होती.

जळगांवची तरुणी कशी झाली 'म्हाळसा'? पाहा मराठमोळ्या सुरभी हांडेचा अनोखा प्रवास

‘द फॅमिली मॅन 2’ ही वेबसीरिज पुढील महिन्यात म्हणजेच 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमॅझॉन प्राइम वर ही सीरिज पाहता येणार आहे. श्रीकांत तिवारी या मध्यामवर्गीय माणसाची ही कहानी आहे. व्यस्त आणि ताणतणाव पूर्ण कामातही तो घर आणि काम यांचा समतोल कसा सांभाळतो अशी एकंदरितच या सीरिजची कथा आहे. या सीरिज मध्ये अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar), प्रियमणि, सनी हिंदुजा, शहाब अली, मेहेक ठाकूर, वेदांत सिन्हा, दर्शन कुमार आदी कलाकार देखिल दिसणार आहेत.

First published:

Tags: Entertainment, Kangana ranaut