Home /News /entertainment /

कंगनाने केलं पाकिस्तानचं कौतुक, नवं ट्विट होतय व्हायरल

कंगनाने केलं पाकिस्तानचं कौतुक, नवं ट्विट होतय व्हायरल

कंगनाने यावेळी चक्क पाकिस्तानचं (Pakistan) कौतुक केलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींचीही स्तुती केली आहे. (Kangana praises Pakistan)

  मुंबई 24 एप्रिल  : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) विविध कारणांसाठी सतत चर्चेत येत आहे. तसेच तिचे ट्विट (controversial tweet) नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. पण यावेळी कंगनाच्या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. कारण कंगनाने यावेळी चक्क पाकिस्तानचं (Pakistan) कौतुक केलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींचीही स्तुती केली आहे. (Kangana praises Pakistan) कंगनाने ट्विट मध्ये म्हटलं आहे, “पाकिस्तानात चाललेला टॉप ट्रेंड पाहून फार छान वाटलं. #PakistanStandsWithIndia... भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो. ” त्यामुळे कंगनाच्या या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या देशातील कोरोनाची स्थिती (corona pandemic) अतिशय बिकट झाली आहे. रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. तर वैद्यकिय सुविधा या अपुऱ्या पडत आहेत. यातच पाकिस्तानने काही अँम्बुलन्स भारताला पुरवण्याचा प्रस्ताव पुढे केला तसेच #PakistanStandsWithIndia हा ट्रेंड देखिल सुरू झाला त्यामुळे अनेक जन अवाक् झाले.

  OSCAR 2021 : प्रियांका चोप्राचा The White Tiger जिंकणार ऑस्कर? एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती

  पाकिस्तानच्या या मदतीवर भारताने अद्याप कोणताही निर्णय दिला नसला तरीही अनेकजन याच कौतुक करत आहेत. आणि कंगनाने देखिल हा ट्रेंड पाहून पाकिस्तानची स्तुती केली आहे. कंगना लवकरच ‘थलायवी’ (Thalaivi), ‘धाकड’, ‘तेजस’ या चित्रपटातं दिसणार आहे. थलायवी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाउनमुळे चित्रपटाचं प्रदर्शन रद्द झालं आहे. पण कंगना तिच्या ट्विटर सतत सक्रिय असते. रोजच निरनिराळ्या विषयांवर भाष्य करत ती ट्विट करत असते.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Kangana ranaut

  पुढील बातम्या