मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kangana Ranaut: तापलेलं अंग आणि डेंग्यू असूनही कंगनाचा वर्क मोड ऑन; अभिनेत्रीचं होतंय कौतुक

Kangana Ranaut: तापलेलं अंग आणि डेंग्यू असूनही कंगनाचा वर्क मोड ऑन; अभिनेत्रीचं होतंय कौतुक

कंगना सध्या आजारी असून तिच्या अंगात खूप ताप असल्याचं समोर आलं आहे. असं असूनही तिचं तिच्या कामावर असलेलं प्रेम दिसून आलं आहे.

कंगना सध्या आजारी असून तिच्या अंगात खूप ताप असल्याचं समोर आलं आहे. असं असूनही तिचं तिच्या कामावर असलेलं प्रेम दिसून आलं आहे.

कंगना सध्या आजारी असून तिच्या अंगात खूप ताप असल्याचं समोर आलं आहे. असं असूनही तिचं तिच्या कामावर असलेलं प्रेम दिसून आलं आहे.

    मुंबई 09 ऑगस्ट: अभिनेत्री कंगना रणौत सध्या अनेक कारणांनी चर्चेत येताना दिसत असते. सध्या मात्र कंगनाची तब्येत बरीच बिघडली असल्याचं समोर आलं आहे. कंगनाला डेंग्यू झाला असून याबद्दल तिच्या प्रॉडक्शन हाऊसने माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा कंगना सेटवर पोहोचून काम करताना दिसत आहे. अंगात ताप असताना, डेंग्यू असतानाही कंगना घरी राहून आराम न करता सेटवर पोहोचल्याचं समोर आलं आहे. (kangana ranaut) तिच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मनकर्णिका प्रॉडक्शन’ ने तिचं याबद्दल कौतुक केल्याचं समोर आलं आहे. “जेव्हा तुम्हाला डेंग्यू असतो तेव्हा तुमचा पांढऱ्या रक्तपेशींचा आकडा कमी झालेला असतो आणि तुम्हाला अंगात खूप ताप येतो. आणि असं असूनही तुम्ही कामाच्या ठिकाणी पोहोचता… हे पॅशन नव्हे तर कामाबाबतीत विलक्षण वेडेपणा आहे. आमच्या चीफ कंगना मॅम लवकर बऱ्या व्हा.तुम्हाला खूप शक्ती मिळो.” कंगनाची टीम तिला एक इन्स्पिरेशन समजत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावर कंगनाने स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसचे आभार मानत इन्स्टाग्राम स्टोरी टाकली आहे. ती असं लिहिते, “थँक यु टीम मनकर्णिका फिल्म्स, शरीर केवळ आजारी असतं आत्मा नाही. एवढ्या गोड शब्दांसाठी खूप धन्यवाद.” सध्या कंगना ही तिच्या अपकमिंग सिनेमा ‘एमर्जन्सी’ मुळे खूप चर्चेत आहे. यामध्ये ती भारताच्या पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाची पहिली झलक समोर आली असून कंगनाने हुबेहूब साकारलेली इंदिरा यांची भूमिका दिसून येत आहे. तिच्या अभिनयशैलीचं सुद्धा खूप कौतुक होत आहे. ती स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा करणार असल्याचं समोर आलं आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होईल. यामध्ये अनुपम खेर हे जे पी नारायण यांचं पात्र साकारताना दिसणार आहेत तर मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगनासह इतर दोन कलाकारांचे पोस्टर सध्या रिलीज केले असून एकूणच सिनेमाबद्दल खूप उत्सुकता दिसून येत आहे.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Kangana ranaut

    पुढील बातम्या