Home /News /entertainment /

'Covid वर कशी मात केली हे सांगणार नाही', कोरोनामुक्त होताच कंगनाची अजब पोस्ट

'Covid वर कशी मात केली हे सांगणार नाही', कोरोनामुक्त होताच कंगनाची अजब पोस्ट

सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत तिने आपण निगेटिव्ह झालो असल्याचं सांगितलं आहे. पण मी कशाप्रकोरे कोरोनाला हरवलं हे सांगितलं तर अनेकांना वाईट वाटेल त्यामुळे मी सांगणार नाही अस म्हणतं तिने एक पोस्ट लिहिली आहे.

  मुंबई 18 मे : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सतत काहीना काही कारणाने मीडियात तसेच सोशल मीडियावर चर्चेत असेतच. तर काही दिसांपूर्वीच कंगनालाही (Corona) कोरोनाची लागण झाली होती, पण आता तिने कोरोनावर मात केली आहे. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, आपण कोरोनाला कसं हरवलं हे सांगणार नसल्याचं तिने म्हटलं आहे. (Kangana corona report) सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत तिने आपण निगेटिव्ह झालो असल्याचं सांगितलं आहे. मात्र, मी कशाप्रकारे कोरोनाला हरवलं हे सांगितलं तर अनेकांना वाईट वाटेल त्यामुळे मी सांगणार नाही अस म्हणतं तिने एक पोस्ट लिहिली आहे. तर त्या पोस्ट मध्ये तिने लिहिलं आहे, ‘नमस्कार आज मी कोरोना निगेटिव्ह झाले. मला खूप काही सांगायची इच्छा आहे की मी कोरोनाला कसं हरवलं पण मला सांगण्यात आलं आहे की कोरोनाच्या चाहत्यांना नाराज करू नको.’ पुढे कंगना लिहीते, ‘हो असे काही लोक आहेत ज्यांना कोरोनविषयी वाईट बोलल्यास वाईच वाटते. असो तुम्हा सगळयांच्या आशिर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. या कारणामुळे कंगनाने आपण काही बोलणार नाही असं म्हटलं आहे.’
  दरम्यान काही दिवसांपूर्वी कंगना कोरोना संक्रमित झाली होती. तेव्हा त्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली होती. हिमाचल ला जाण्यासाठी तिने टेस्ट केली असता तिला पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आला. त्यानंतर तिने घरीचं स्वतःला कॉरन्टाइन केलं होतं. तर आता तिने कोरोनावर मात केली आहे.

  'बिग बॉस 14'ची विजेती रुबिना दिलैकने सांगितला Covid रिकव्हरीचा प्रवास, पाहा VIDEO

  कंगना सध्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर सक्रिय असेत. काही दिवसांपूर्वी तिचं ट्विटर (Twitter) अकाउंट बंद करण्यात आलं होतं. इन्स्टाग्रामवर ती स्टोरीज वर तिची मतं मांजत असते.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Kangana ranaut

  पुढील बातम्या