या अभिनेत्रीने सासूला दिलं वाढदिवसाचं भन्नाट गिफ्ट, तुम्हीही व्हाल भावुक

या अभिनेत्रीने सासूला दिलं वाढदिवसाचं भन्नाट गिफ्ट, तुम्हीही व्हाल भावुक

अभिनेत्रीने सासूचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आपलं मन मोकळं केलं.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावलाने सासू सुनैना यांना वाढदिवसानिमित्त फार सुरेख भेटवस्तू दिली. सध्या याच भेटवस्तूची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. जुहीने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सासूचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने चाहत्यांसमोर आपलं मन मोकळं करत म्हटलं की, 'सासू सुनैना यांच्या वाढदिवसाला 1 हजार रोपं. देवाची माझ्यावर नेहमीच कृपा आहे.

बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखांमधून नाव कमावणारी अभिनेत्री जूही चावला पुढे म्हणाली की, 'जेव्हा जेव्हा मला वाटतं की माझं जग संपुष्टात येत आहे तेव्हा त्यांनी नेहमीच मला साथ दिली. जेव्हा मी कुठेतरी हरवत आहे असं वाटतं तेव्हा त्या नेहमीच माझ्यासोबत होत्या.' 1995 मध्ये जूही चावलाने व्यावसायिक जय मेहता यांच्याशी लग्न केलं.

जूही चावला आणि जय मेहता यांना जाह्नवी मेहता आणि अर्जुन मेहता अशी दोन मुले आहेत. जूहीने 1986 मध्ये 'सल्तनत' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम सिनेमात काम केलं. 1984 मध्ये जूही चावलाने मिस इंडियाचं जेतेपद जिंकलं होतं.

 

View this post on Instagram

 

May all the tensions in your life burn along with the effigy of Ravana✨ May you be successful & happy ever! #HappyDussehra 😇🙏

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla) on

#sairatmetshadak- रिंकू-जान्हवीचा एकत्र फोटो पाहून चाहते झाले झिंगाट!

83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना, पाहा PHOTOS

मामा-भाच्यांचे असेही वैर; गोविंदामुळे कृष्णाने सोडला कपिल शर्माचा शो

लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, शेअर केला PHOTOS

First Published: Oct 14, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading