Home /News /entertainment /

'त्याने जियाला टॉप उतरवायला सांगितला...', Jiah Khan च्या बहिणीचा साजिद खानवर धक्कादायक आरोप

'त्याने जियाला टॉप उतरवायला सांगितला...', Jiah Khan च्या बहिणीचा साजिद खानवर धक्कादायक आरोप

जिया खान (Jiah Khan Sister Karishma) च्या आयुष्यावर बनवण्यात आलेली डॉक्यूमेंट्री डेथ इन बॉलिवूड (Death in Bollywood) अलीकडेच यूकेमध्ये प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये जिया खानच्या बहिणीने दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 जानेवारी: बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या बहिणीने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. जिया खानची (Jiah Khan) ची बहिण करिश्माने साजिदवर सेक्शुअल हॅरॅसमेंट (Sexual Harassment) चा आरोप करत काही धक्कादायक वक्तव्य केली आहेत. तिने असे आरोप केले आहेत की साजिदने केवळ जियाचे लैंगिक शोषण केले नाही, तर तिचा देखील फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. जिया खान (Jiah Khan Sister Karishma) च्या आयुष्यावर बनवण्यात आलेली डॉक्यूमेंट्री डेथ इन बॉलिवूड (Death in Bollywood) अलीकडेच यूकेमध्ये प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये जिया खानच्या बहिणीने दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. करिश्माने यावेळी अशी माहिती दिली की, साजिदच्या या गैरवर्तनानंतर जिया पूर्णपणे कोलमडली होती. घरी पोहोचल्यावर तिला रडू कोसळलं. यावेळी करिश्मा असं म्हणाली की, 'रिहर्सल चालू होती आणि ती (जिया) स्क्रीप्ट वाचत होती. त्यावेळी त्याने (साजिद) तिला टॉप आणि ब्रा उतरण्यास सांगितले. तेव्हा ती खूप घाबरली होती. तिला कळत नव्हतं की तिने काय करायला पाहिजे. ती हा विचार करून त्रस्त होती ही सिनेमा सुरू होण्याआधी अशी परिस्थिती आहे. घरी येऊन ती खूप रडली होती.' (हे वाचा-Tandav : हिंदू देवतांचा अवमान प्रकरणी वेब सीरिजच्या टीमकडून पहिली प्रतिक्रिया) करिश्माने पुढे असं म्हटलं की, 'यानंतरही तिला सिनेमा करावा लागला. तिने असं म्हटलं होतं की तिचं कॉन्ट्रॅक्ट आहे. जर सिनेमा मध्येच सोडला तर ते माझी बदनामी करतील आणि माझं करिअर संपवतील.' करिश्माने यावेळी तिच्याबरोबरही गैरवर्तन झाल्याचे म्हटले आहे. तिने असे म्हटले की, 'मला आठवतय मी जियाबरोबर साजिदच्या घरी गेले होते. मी त्यावेळी स्ट्रॅपी टॉप घातला होता. मी त्यावेळी 16 वर्षांची होते. मी किचनमध्ये टेबलवर बसले होते आणि तो माझ्याकडे पाहत होता. त्याने जियाला असं म्हटलं की 'तिला सेक्स हवा आहे'. यावर जियाने लगेच त्याला असे म्हटले होते की, काय बकवास करतो आहेस. त्यावर त्याने असं म्हटलं की- बघ ती कशी बसली आहे. जियाने असं म्हटलं की ती खूप लहान आहे, तुला तिच्याबद्दल असं बोलायला नाही पाहिजे. त्यानंतर आम्ही तिथून निघून आलो.' (हे वाचा-'रिया चक्रवर्ती बिचारी निर्दोष आहे' आलियाची आई आली समर्थनार्थ धावून) जिया खानने साजिद खानबरोबर हाउसफुलमध्ये काम केलं होतं. ज्यामध्ये अक्षय कुमार, दीपिका पादूकोण, रितेश देशमुख, लारा दत्ता आणि अर्जून रामपाल यांनी भूमिका केल्या होत्या.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या