Home /News /entertainment /

HBD Jasmin Bhasin : 'मी दिसायला चांगली नाही म्हणून रिजेक्शन येतंय, असं वाटून आत्महत्येचा विचारही केला होता' - अभिनेत्रीने सांगितलं धक्कादायक सत्य

HBD Jasmin Bhasin : 'मी दिसायला चांगली नाही म्हणून रिजेक्शन येतंय, असं वाटून आत्महत्येचा विचारही केला होता' - अभिनेत्रीने सांगितलं धक्कादायक सत्य

जास्मिन भसीन (Jasmin Bhasin Birthday) हिचा आज वाढदिवस आहे. जाणून घ्या तिच्याविषयी काही खास गोष्टी.

मुंबई, 28 जून : अलीकडच्या काळात रिअ‍ॅलिटी शो (Reality Show) हे विशेषत: सेलेब्रिटींसाठी (Celebrity) भरपूर प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळवून देणारे शो झाले आहेत. या शोचा आयोजकांकडूनही लोकप्रिय तसंच वादग्रस्त सेलिब्रिटींना अथवा व्यक्तींना एका घरात आणलं जातं. त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व, स्वभाव, गुणदोष हे लोकांसमोर येत असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील काही रहस्य ही यातून उलगडली जातात. असं असलं तरी त्यांच्यातील वाद, अफेअर यामुळेच असे शो अधिक लोकप्रिय ठरतात. याशिवाय यातील सहभागी सतत चर्चेत राहतात. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस 14 (Big Boss) या लोकप्रिय अशा रिअ‍ॅलिटी शोमधील माजी स्पर्धक जास्मिन भसीन (Jasmin Bhasin Birthday) हिचा आज वाढदिवस आहे(Birhday Special story). तिचा जन्म 28 जून 1990 मध्ये झाला. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे. छोट्या पडद्यावरील 'दिल से दिल तक' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई हे तिचे को-स्टार होते. या मालिकेनंतर ती बिग बॉस- 14 या सीझनमध्ये पाहावयास मिळाली. त्यानंतर 'नागिन 4' ची मालिका तसेच 'खतरों के खिलाडी' या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती दिसली. या रिॲलिटी शो मध्ये जस्मिन भसीन आणि अली गोनी यांच्या अफेअरची (jasmin bhasin, ali goni relationship)चर्चा झालीच शिवाय तिच्या खासगी आयुष्यातील डार्क फेजचाही उलगडा झाला. या शोमध्ये तिने सांगितलं की आयुष्यात एक वेळ अशी आली होती की आत्महत्येच्या विचारात ती होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात काम न मिळाल्यामुळे तिच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता आपल्यात कमतरता असल्याचं तिला जाणवत होतं. हेही वाचा - Mangesh Desai Birthday: 'तू बिनधास्त कामाला लाग, मी...' सिनेमा करताना एकनाथ शिंदेंनी मंगेशला दिला होता विश्वास एका मुलाखतीत जास्मिननं सांगितलं की, मुंबईत आल्यानंतर माझी स्पर्धा ही स्वतः शी होती. मी दिसायला चांगली नाही त्यामुळेच सगळीकडून मला नकार मिळत आहे, असं मला वाटत होतं. तिनं सांगितलं, ‘तो काळ संघर्षाचा होता. अनेक ऑडिशन्स देऊनही मला रिजेक्शनच मिळत होतं तेव्हा वाटायचं माझी त्वचा चांगली नाही त्यामुळे मी मागे पडते आहे. माझा आत्मविश्वास कमी व्हायचा. त्या काळात मला आत्महत्या करावंसं वाटलं होतं.’
‘माझ्यातील कमतरता शोधल्या. मला जे घडावं असं वाटत होतं त्यावर लक्ष केंद्रीत करून ते मिळवण्यासाठी मी 100 टक्के प्रयत्न केला. असं केल्यावर मला यश मिळालं.’ असंही जस्मिननं सांगितलं. दरम्यान, जस्मिन आणि बॉयफ्रेंड अली गोनी यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये आहेच आता चाहते वाट पाहत आहेत ते त्यांच्या लग्नाची. जस्मिनला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
First published:

Tags: Big boss, Bollywood, Entertainment

पुढील बातम्या