श्रद्धा कपूरनंतर आता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला गंभीर आजार, ट्विटरवर लिहिली पोस्ट

श्रद्धा कपूरनंतर आता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला गंभीर आजार, ट्विटरवर लिहिली पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं तिला Physical Anxiety असल्याचं कबुल केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं ती आजारग्रस्त असल्याची माहिती तिच्या ट्विटरवरु दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं तिला Physical Anxiety असल्याचं कबुल केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं ती आजारग्रस्त असल्याची माहिती तिच्या ट्विटरवरु दिली आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रुझनं मागच्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यामुळे चर्चेत आहे. या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले असून त्यामुळे आता दोघांपैकी कोणीही पॅचअप करण्याच्या मनस्थितीत नाही. अशात आता इलियानानं तिला झालेल्या एका आजाराची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

इलियानानं नुकतच तिच्या ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तिनं तिच्या आजाराविषयी माहिती दिली आहे. तिनं लिहिलं, मी आता ही गोष्ट पूर्णपणे स्वीकारली आहे की मला झोपेत चालण्याचा आजार झाला आहे. ज्यामुळे अनेकदा माझ्या पायांना सूज येते तसेच मी जखमी सुद्धा होत आहे. सुरुवातीला हे सर्व मला खूपच रहस्यमयी वाटलं. मात्र आता मी झोपेत चालत असल्यानं होत असल्याचं माझ्या लक्षात येत आहे . कारण या व्यतिरिक्त विचार करण्याचा कोणताही पर्याय उरत नाही.

रानू मंडल नाही तर 'ही' आहे स्टेशनवर गाणं गाणारी पहिली प्लेबॅक सिंगर

इलियानानं अशाप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्याशी आजाराविषयीची माहिती शेअर केली आहे. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. काहींनी तिला डॉक्टर जाण्याचा सल्ला दिला तर काही दिवसांसाठी तू तुझ्या रुममध्ये कॅमेरा लाव असं म्हटलं आहे. एका युजरनं लिहिलं, जेव्हा तु उठतेस त्यावेळी तु जर तुझ्या बेडवर असशील की, कोणत्या दुसऱ्या जागेवर जर तू तुझ्या बेड ऐवजी दुसऱ्या जागेवर असशील तर तु स्लीप वॉकिंगची शिकार झाली आहे आणि जर असं नसले तर तुला भूतबाधा झालेल असू शकते.

VIRAL PHOTOS मुळे पिवळ्या साडीतली 'ती' अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत

याशिवाय तिच्या या पोस्टवर इतरही अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. एका युजरनं लिहिलं, माझ्या एका मित्रालाही स्लीपवॉकची समस्या आहे. यावर कोणताही ठोस उपाय नाही आणि अनेकदा यामुळे तुम्हाला त्रास सहान करावा लागतो. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच रुममध्ये कॅमेरा, मॅट आलर्म किंवा डोअर अलार्म लावावा.

'स्वराज्य जननी जिजामाता'मध्ये छोट्या जिजाऊंनी केलं धाडस कारण...

==============================================================

फ्री स्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील काही खास क्षण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या