Home /News /entertainment /

'नेहमीच पंजांनी शिकार होत नाही तर कधी कधी....'; हेमांगी कवीची नवी पोस्ट चर्चेत

'नेहमीच पंजांनी शिकार होत नाही तर कधी कधी....'; हेमांगी कवीची नवी पोस्ट चर्चेत

अभिनेत्री हेमांगीनं एक नवा फोटो शेअर केला आहे. हेमांगीच्या या फोटोपेक्षा तिच्या कॅप्शननं लक्ष वेधलं आहे.

  मुंबई, 24 जून : कोणतंही क्षेत्र असो नेहमीच आपलं परखड मत मांडणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी(Hemangi kavi). हेमांगी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच काहीतरी नवीन पोस्ट करुन आपलं मत मांडत असते. त्यामुळे हेमांगी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून  ती व्यक्त होताना दिसते. अशातच हेमांगी (hemangi kavi new post)तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री हेमांगीनं एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हेमांगी नेहमीप्रमाणे झकास पहायला मिळतेय. हेमांगीच्या या फोटोपेक्षा तिच्या कॅप्शननं लक्ष वेधलं आहे. तिचं भन्नाट कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे. 'शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी शिकार होते. नेहमीच पंजांनी नाही तर कधी कधी डोळ्यांनी होते...तेव्हा जपून, असं कॅप्शन हेमांगीनं फोटोला दिलं आहे. हेमांगीचा नवा फोटो आणि कॅप्शन सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक लाईक्सचाही वर्षाव होत आहे.
  हेमांगीनं अनेक वेळा केलेल्या वक्तव्यांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कालच हेमांगीनं एक पोस्ट केली होती. ती पोस्ट राजकीय संदर्भात केल्याचं अनेकांना वाटलं यावरुन तिला अनेक सल्ले देण्यात आले. मात्र तिच्या पोस्टवरुन गोंधळ उडाल्यानंतर तिनं नक्की कशाविषयी पोस्ट केली होती हे सांगितलं.  पोस्टमध्ये हेमांगीनं म्हटलं होतं की, आता कुणाला खरं वाघ म्हणायचं?. तिच्या या पोस्टवरुन अनेकांनी तिनं राज्यात आलेल्या राजकीय भूकंपावर पोस्ट केल्याचं म्हटलं मात्र याविषयी तिनं आणखी एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. हे ही वाचा - VIDEO: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड निघाली वारीच्या वाटेवर! हरिनामाच्या गजरात धरला ठेका हेमांगीनं आगामी मराठी चित्रपट 'तमाशा'विषयी ही पोस्ट केली होती. चित्रपटासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करुन हेमांगीनं 'हाच खरा वाघ' असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं. त्यामुळे हेमांगीनं केलेली पहिली पोस्ट राजकीय भूकंपाविषयी नसून चित्रपटाविषयी असल्याचं सांगितलं. हेमांगीची ही पोस्ट अगदी काही कालावधीतच व्हायरल झालेली पहायला मिळाली.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment, Photo

  पुढील बातम्या