'एप्रिलपर्यंत No Holiday'! लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून कामात व्यस्त आहे गौहर खान

'एप्रिलपर्यंत No Holiday'! लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून कामात व्यस्त आहे गौहर खान

अभिनेत्री आणि मॉडेल गौहर (Gauhar Khan) खान गेल्या वर्षी 25 डिसेंबरला कोरिओग्राफर आणि टिकटॉक फेम झैद दरबार (Zaid Darbar) याच्याबरोबर विवाहबंधनात अडकली. त्यानंतर लगेचच ती पुन्हा एकदा तिच्या चित्रपटाच्या आणि मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी: अभिनेत्री आणि मॉडेल गौहर (Gauhar Khan) खान गेल्या वर्षी 25 डिसेंबरला कोरिओग्राफर आणि टिकटॉक फेम झैद दरबार (Zaid Darbar) याच्याबरोबर विवाहबंधनात अडकली. त्यानंतर लगेचच ती पुन्हा एकदा तिच्या चित्रपटाच्या आणि मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. एप्रिलपर्यंत तिच्याकडे वेळ नसून ती त्यानंतरच फ्री होणार असल्याचे तिने म्हटले आहे. लग्नानंतर ती सध्या खूप व्यस्त असून हनिमूनसाठी देखील तिच्याकडे वेळ नाही.

याविषयी अधिक बोलताना गौहर खानने (Gauhar Khan) असं म्हटलं आहे की, माझ्या वालिमाच्या (marriage banquet) दुसऱ्या दिवसापासून मी काम सुरू केले आहे. माझ्या लग्नाला आता 15 दिवस होत आले असून दररोज मी शूटिंग करत आहे. सध्या माझ्या एका चित्रपटाचे आणि 2 मालिकांचे शूटिंग सुरू आहे. आम्ही दोघांनी लग्नापूर्वी एकत्र खूप काम केलं आहे. परंतु सध्या एप्रिलपर्यंत माझ्याकडे अजिबात वेळ नसून मी कधी फिरायला जाणार आहे हे देखील मला माहित नाही.

गौहरचा पती झैद दरबार आणि तिने एकत्र याआधी अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. भविष्यात एकत्र काम करण्याच्या प्रश्नाविषयी बोलताना तिने आम्हाला अनेक भूमिका आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याच्या ऑफर्स आलेल्या आहेत. गौहरचा पती झैद दरबार हा कोरिओग्राफर असून त्याने अनेक म्युझिक व्हिडीओसाठी काम केलं आहे. गौहर खान हिनेदेखील बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई , इशकजादे, क्या कूल हैं हम 3, बेगमजान  या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. याचबरोबर टेलिव्हिजनवरील बिग बॉस(Bigg Boss) या रिऍलिटी शोची देखील ती विजेता आहे.

हे वाचा- विरुष्काची मुलगी किती कोटींच्या फ्लॅटमध्ये राहणार! पाहा

दरम्यान, गौहर(Gauhar Khan) सध्या तिच्या आगामी चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग करत असून लवकरच तिची वेबसीरीज येणार आहे. तांडव (Taandav) नावाच्या या वेबसिरीजमध्ये तिच्याबरोबर सैफ अली खान(Saif Ali Khan), डिंपल कपाडिया, कुमुद मिश्रा, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धूलिया, मोहम्मद झीशान अयूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, डिनो मोरिया, अनुप सोनी, संध्या मृदुल आणि शोनाली नागरानी हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राईमवर (Amazon prime) ही सिरीज रिलीज होणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 13, 2021, 9:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading