• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मेहुणी शमिता शेट्टीसोबतही राज कुंद्रा करणार होता चित्रपट; अभिनेत्रीने केला खळबळजनक दावा

मेहुणी शमिता शेट्टीसोबतही राज कुंद्रा करणार होता चित्रपट; अभिनेत्रीने केला खळबळजनक दावा

राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पण त्याच्या विरोधात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पण त्याच्या विरोधात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तर अनेक अभिनेत्रींनीही त्याच्या विरोधात आता जवाब नोंदवले आहेत. अभिनेत्री गहना वशिष्ठने (Gahana Vashisht) काही दिवसांपूर्वी मीडियासमोर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिने या प्रकरणावर तिचं मत मांडलं होतं. दरम्यान उद्योगपती राज कुंद्राला मागील सोमवारी मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली होती. यानंतर आणखी 11 लोकांना पोलिसांना अटक करण्यात आली. फेब्रुवारी महिण्यातच या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात झाली होती. पण राज कुंद्राने 25 लाख रुपये लाच देऊन चौकशी लांबवली असल्याची माहिती ही नुकतीच समोर आली होती.

  Raj Kundra arrest Live Updates: राज कुंद्राविरोधात जवाब दिलेल्या अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी; न्युड ऑडिशनचा केला होता आरोप

  अभिनेत्री गहना वशिष्ठने नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “अटकेच्या काही दिवस आधी मी राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये गेले होते. तिथे मला समजल की ते 'बॉलीफेम' नावाचं अँप लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सर्वकाही तयार होतं. अँपसाठी रियॅलिटी शो, चॅट शो, म्युझिक व्हिडिओ, कॉमेडी शो आणि नॉर्मल फिल्म बनवण्याची तयारी सुरू होती दरम्यान यात कोणत्याही बोल्ड चित्रपटाचा समावेश नव्हता.”
  पुढे गहना म्हणाली की, ती कधीही शमिता शेट्टीला भेटली नाही. ती म्हणाली की तिला माहीत होतं की शमिता केवळ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होती. आणि ती त्यातच व्यस्त होती. पुढे शमिता शेट्टी , तिची फीस आणि अटी याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं तिने म्हटलं. दरम्यान या प्रकरणाचा आता कसून तपास सुरू आहे. अनेक नावंही समोर येत आहेत. काही लोकांची चौकशी सुरू आहे. अद्याप अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा यात कोणताही सक्रीय सहभाग नसल्याचं म्हटलं जात आहे.
  Published by:News Digital
  First published: