मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तारक मेहताच्या 'या' अभिनेत्रीनं घेतली चमचमती कार, कुटुंबाला दिलं सरप्राइज गिफ्ट

तारक मेहताच्या 'या' अभिनेत्रीनं घेतली चमचमती कार, कुटुंबाला दिलं सरप्राइज गिफ्ट

मुली सतत प्रगती करत आपल्या कुटुंबाला अभिमानाचे अनेक क्षण देत आहेत. एका लोकप्रिय अभिनेत्रीनंही एक अशीच कृती केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 जानेवारी : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही सिरियल (serial) प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. सलग कित्येक वर्षांपासून मालिकेची लोकप्रियता कमी न होता उलट वाढतंच आहे.

या मालिकेमधील सोनूच्या भूमिकेतील अभिनेत्री पलक सिधवानी (Palak Sidhwani) बरीच लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेच्या बळावरच तिनं कमी काळात डोळे दिपवून टाकणारी प्रगती केली आहे. नुकतीच पलकनं आपल्या कमाईतून कुटुंबासाठी पहिली गाडी विकत घेतली. ब्रँड न्यू ह्युंडाईची (Hyundai) ही चमचमती गाडी तिच्या कुटुंबियांना अतिशय आवडली आहे.

पलकला याचा खूप अभिमान वाटतो आहे, की कुटुंबाला आजवरची सर्वात पहिली गाडी तिनं भेट दिली आहे. आपल्या वडिलांच्या जन्मदिनी (father's birthday) पलकनं ही गाडी त्यांना भेट दिली आहे. ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून आपल्या वडिलांच्या वाढदिवसासाठी सरप्राईज प्लॅन करत होती. आपल्या युट्युब चॅनलवरही (youtube channel) तिनं सांगितलं, की ती वडिलांना ही गाडी भेट देणार आहे.

पलकनं ब्लॅक आणि व्हाईट रंगाची ही गाडी स्वतः शोरूमला जात खरेदी केली. शोरूममध्ये आई-वडिलांसोबत गेलेली पलक सगळी आर्थिक व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करताना व्हिडिओमध्ये दिसते आहे.

तिच्या कुटुंबाला खूप आनंद झाल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतं आहे. तिची आई तर याप्रसंगी खूप भावनिक झाली आहे. तेव्हा पलक आपल्या आईला मिठीत घेत म्हणते, की तुला रडवायला नाही तर हसवायला ही गाडी घेतली आहे. पलकनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहीत आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली.

First published:

Tags: Car, Instagram