• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सेम टू सेम! दयाबेनची कार्बन कॉपी आहे ही महिला; मालिकेत घेण्याची चाहत्यांची मागणी

सेम टू सेम! दयाबेनची कार्बन कॉपी आहे ही महिला; मालिकेत घेण्याची चाहत्यांची मागणी

सोशल मीडियावर एका वेगळ्या दयाबेनची हवा पाहायला मिळत आहे. ही महिला अगदी दयासारखाच अभिनय करत आहे.

 • Share this:
   मुंबई 29 जून : छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेली अनेक वर्षे सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण मागील काही वर्षे प्रेक्षक मालिकेतील लोकप्रिय पात्र ‘दयाबेन’ची (Dayaben) वाट पाहत आहेत. तर आता दयाच्या पत्रातील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मालिकेत दयाने प्रेक्षकांवर एक वेगळी छाप पाडली होती. तिचे अनेक डायलॉग हे प्रचंड लोकप्रिय झाले होते. तर तिचं पात्र हे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे दया म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानीने (Disha Wakani) मालिका सोडल्यानंतर प्रेक्षक अजूनही तिच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता ती परतणार नसल्याचं म्हटलं जातं आहे.

  'फ्रेशर्स' फेम अमृता देशमुखचा मराठमोळा साज; पैठणीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

  दिशा जरी परतणार नसली तरीही तिची कॉपी असणारी एक महिला फारच चर्चेत आहे. ही मुलगी एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे. ती युट्युबवर तिचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. तर यावेळी तिने दयाच्या रुपात एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती हुबेहूब दयाच दिसत आहे. गरिमा गोयल असं या मुलीचं नाव असून ती लोकप्रिय होतं आहे. गरिमाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर फारच व्हायरल होताना दिसत आहे. तिला अनेक कमेंट्स ही मिळत आहेत. काहींनी तर तिलाच आता मालिकेत घेण्याची मागणीही केली आहे. 2017 साली अभिनेत्री दिशा वाकानी ने प्रेग्नन्सी लिव्ह घेतली होती. त्यानंतर ती परतणार असल्याचं म्हटलं जातं होतं पण अद्याप ती परतली नाही. नुकतच प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला (Divyanka Tripathi) हे पात्र दिलं असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण दिव्यांकाने हे पात्र साकारण्यास नकार दिला. व आपण काहीतरी फ्रेश पात्र पाहत आहोत असं ती म्हणाली.
  Published by:News Digital
  First published: