'किलर लग रही हो', दिशा पटानीच्या 'त्या' फोटोवर चाहते झाले फिदा

'किलर लग रही हो', दिशा पटानीच्या 'त्या' फोटोवर चाहते झाले फिदा

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या हॉट फोटोमुळे दिशा पटानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी दिशा पटानी नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. तिचे चाहते त्यावर प्रतिक्रियाही देत असतात. तिच्या या फोटोमुंळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागतं पण दिशावर मात्र याचा तितकासा फरक पडत नाही. त्यामुळेच ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते. नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर पिंक कलरच्या मोनोकिनीमधला फोटो शेअर केला.

दिशानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या कडेला उभी आहे. दिशाच्या या हॉट अवतारानं वातावरणातील तापमान आणखीनच वाढत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. दिशाच्या या लुकवर तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत. तिच्या हॉट लुकवर तिचे चाहते अक्षरशः फिदा झालेले पाहायला मिळत आहेत. काहींनी तिला किलर तर काहींनी क्वीन म्हटलं आहे. त्यामुळे दिशा पटानी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

🌸🐡

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

टायगर श्रॉफसोबत रिलेशनशीपमुळे चर्चेत असणाऱ्या दिशानं बिकीनी किंवा मोनोकिनी लुक शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं इन्स्टाग्रामवर अनेकदा असे हॉट फोटो शेअर केले आहेत. येत्या 5 जूनला तिची महत्वाची भूमिका असलेला 'भारत' सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दिशा व्यतिरिक्त सलमान खान कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर सुनिल ग्रोव्हर तब्बू आणि जॅकी श्रॉफ हे सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात दिशा स्टंट करताना दिसणार असल्यानं तिचा हा नवा अवतार पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

बिग बींनी शेअर केला 'पुकार'च्या सेट वरील फोटो, ओळखा पाहू कोण आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री ?

Cannes 2019 - ‘अजून राहत जा रणवीर सिंगसोबत...’ दीपिकाच्या या लुकवर नेटकऱ्यांनी केले भन्नाट कमेंट

...म्हणून कतरिना एक्स बॉयफ्रेंड सलमानचे फोटो लाईक करत नाही!

First published: May 18, 2019, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading