मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Radhe' च्या सेटवर दिशासाठी ही खासं भेट आणायचे जॅकी श्रॉफ; टायगरच्या वडिलांबरोबर आहे असं बाँडींग

'Radhe' च्या सेटवर दिशासाठी ही खासं भेट आणायचे जॅकी श्रॉफ; टायगरच्या वडिलांबरोबर आहे असं बाँडींग

 ‘राधे’ (Radhe: your most wanted bhai) या चित्रपटात जॅकी (Jackie Shroff) आणि दिशा यांनी एकत्र काम केलं होतं. त्याच अनुभवाविषयी जॅकी यांनी एका मुलाखतीत सांगीतलं आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 14 जुलै: अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पाटनीची (Disha Patani) रोमॅन्टीक केमिस्ट्री गेले काही दिवस बॉलिवूडमध्ये दिसत आहे. अनेकदा हे कपल एकत्र स्पॉट होतं. दोघांच्या नात्याविषयी अनेक चर्चा ही होतात. तर दिशा अनेकदा श्रॉफ कुटुंबियांसोबतही (Shroff family) दिसून येते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘राधे’ (Radhe: your most wanted bhai) या चित्रपटात जॅकी (Jackie Shroff) आणि दिशा यांनी एकत्र काम केलं होतं. त्याच अनुभवाविषयी जॅकी यांनी एका मुलाखतीत सांगीतलं आहे.

जॅकी यांनी इ टाईम्सशी बोलताना दिशासोबत काम करण्याचा  अनुभव सांगीतला. ते म्हणाले, “दिशा प्रत्यक्षात खूपच साधी दिसते. पण जेव्हा ती डान्स करते तेव्हा ती पूर्णपणे कमाल करते. मला माहीत आहे की सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. माझ्यासाठी ही मुलं माझ्या खूप पुढे आहेत. ते ट्रेन आहेत त्यांच्याकडे चांगलं काम करण्याची क्षमता आहे.”

दिशाविषयी बोलताना पुढे ते म्हणाले की, “मी सगळ्या लिडींग अभिनेत्रींचा सन्मान करतो. मी सगळ्यांसोबत एकसारखाच व्यवहार करतो. मग ती न्यूकमर असो किंवा सिनियर असो. तोच व्यवहार माझा दिशासोबतही होता.”

Good News : लग्नानंतर 3 महिन्यांनी आई बनली दिया मिर्झा; बाळाचा पहिला PHOTO केला शेअर

जॅकी यांनी आणखी एक खास गोष्ट सांगत म्हटलं की, “आम्ही काही वेळेला जेवन शेअर केलं होतं. दिशाला गाठिया खूप आवडायच्या त्यामुळे मी कधी कधी तिच्यासाठी गाठिया घेऊन जायचो.”

दिशा आणि टायगर यांनी कधीही जाहीररित्या आपली रिलेशनशिप बोलून दाखवली नसली तरीही त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा असते. नुकताच दिशाचा वाढदिवस होऊन गेला तेव्हा तिने टायगच्या घरी टायगर आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krushna Shroff) सोबत वाढदिवस साजरा केला होता.

First published:

Tags: Disha patani, Entertainment, Tiger, Tiger Shroff