Home /News /entertainment /

दिशा पटानी जॅकी श्रॉफ यांना कशी हाक मारते? सांगितला राधेच्या सेटवरील किस्सा

दिशा पटानी जॅकी श्रॉफ यांना कशी हाक मारते? सांगितला राधेच्या सेटवरील किस्सा

अभिनेत्री दिशा जॅकी श्रॉफ यांना नक्की काय म्हणून हाक मारत असेल असा प्रेमळ प्रश्न दिशाच्या लाखो चाहत्यांना नेहमीच सतावतो. तर आता ते दोघेही एकाच चित्रपटात काम करत असल्याने ती जॅकी यांना नक्की काय म्हणते हे खुद्द जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 9 मे : अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहूप्रतिक्षित चित्रपट काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेते जॅकी श्रॉफ (Jacky Shroff), दिशा पटानी (Disha Patani), रणदीप हुडा (Randeep Hooda) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण अभिनेत्री दिशा जॅकी श्रॉफ यांना नक्की काय म्हणून हाक मारत असेल असा प्रेमळ प्रश्न दिशाच्या लाखो चाहत्यांना नेहमीच सतावतो. तर आता ते दोघेही एकाच चित्रपटात काम करत असल्याने ती जॅकी यांना नक्की काय म्हणते हे खुद्द जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं आहे. अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच नात आता कोणापासूनही  लपून नाही. अनेकदा ते एकत्र दिसतात. अशातच दिशा आणि जॅकी यांनी एकत्र काम केल्याने चाहत्यांच्या प्रश्नांना उधाण आलं आहे. जॅकी यांना हा प्रश्न विचारला असता, त्यांनी इ टाइम्स (Etimes) शी बोलताना सांगितले की, “अस दोन माणसं एकत्र बोलत असताना कोणीही नावाने हाक मारत नाही. जेव्हढ मला आठवतं ती मला बऱ्याचदा सर म्हणून हात मारायची.”

  ‘तर माझे प्राण वाचले असते’; मृत्यूच्या 1 दिवसआधी अभिनेत्यानं केली होती ही पोस्ट

  जॅकी श्रॉफ आणि दिशा एकाच चित्रपटात काम करत असल्याने अनेकदा त्यांचा सेट वर सामना व्हायचा. तेव्हा दिशा त्यांना सर अशी हाक मारायची असं श्रॉफ म्हणाले. चित्रपटात  दिशा ही श्रॉफ यांची बहीण दाखवण्यात आली आहे. तर जॅकी हे दिशाचे मोठे बंधू म्हणून दिसणार आहेत. येत्या ईद ला म्हणजेच 13 मे ला चित्रपट प्रदर्शिद होणार आहे. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर चित्रपट दिसणार असून जगभरात विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहता येणार आहे. टायगर आणि दिशाने कधीही स्वत:हून त्यांच नात मान्य केलं नसल तरीही सोशल मीडियावर आणि एकत्र पार्टीज तसेच ट्रिप्स वर ते स्पॉट होतात. नुकतेच ते दोघेही मालदीव ट्रिप वरून परतले आहेत. दोघांचीही चांगली फॅन फॉलोइंग आहे. तर ते दोघेही बॉलिवूडचं फेवरेट कपल बनत आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Disha patani, Entertainment, Salman khan, Tiger Shroff

  पुढील बातम्या