मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहरुख खानसोबत काम केलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ, म्हणाली...

शाहरुख खानसोबत काम केलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ, म्हणाली...

डेलनाज इराणी

डेलनाज इराणी

बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात आपली एक वेगळी ओळख निर्मीण करण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. कधी कोण यशाच्या उंच शिखरावर जाईल आणि कोण नकळत या सिनसृष्टीपासून दुरावेल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 4  डिसेंबर : बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात आपली एक वेगळी ओळख निर्मीण करण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. कधी कोण यशाच्या उंच शिखरावर जाईल आणि कोण नकळत या सिनसृष्टीपासून दुरावेल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. अनेक कलाकार असे असतात जे काही चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात येतात मात्र नंतर त्यांना कामच मिळत नाही. कलाकार बेरोजगार होतात. असंच काहीसं घडलंय शाहरुख खानसोबत झळकलेल्या एका अभिनेत्रीसोबत. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सिनेसृष्टीतील अनुभवाविषयी सांगतिलं.

शाहरुख खानच्या 'कल हो ना हो' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री डेलनाज इराणी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. नुकतीच तिने सिद्धार्थ कन्ननच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. सिद्धार्थसोबतच्या या मुलाखतीत डेलनाजने खुलासा केला की, गेल्या काही वर्षांपासून तिच्याकडे काम नाही. 2011 नंतर ती कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसली नाही. ती अखेरची शाहरुख खानच्या रा.वनमध्ये दिसली होती.

डेलनाज पुढे म्हणाली, सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. तीने नीना गुप्ता यांचे नावही घेतले आणि म्हणाली, 'मी नीना गुप्ता देखील नाही, परंतु कदाचित कोणीतरी हे पाहील आणि माझ्यासाठी काही योग्य काम बाहेर येईल. मी कोणतीही एजन्सी किंवा व्यवस्थापक नियुक्त केलेला नाही. कल हो ना हो नंतर मला थोडी ओळख मिळाली, तेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी माझा थेट संबंध होता पण आजकाल तो दुवा तुटला आहे. आता तुम्हाला त्यांच्या कार्यालयात जावे लागेल, तिथे गटबाजी असते. डेलनाज इराणीने म्हटले आहे की, जर तुम्ही दीर्घकाळ चित्रपट दिसला नाही तर आपोआप यातून बाहेर पडत जाता.

दरम्यान, टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री डेलनाज इराणीने तिच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भरपूर पैसा आणि प्रसिद्धीही मिळवली. पण अचानकपणे डेलनाज कुठे आहे आणि ती गेली अनेक वर्षे काय करत आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Tv actress