मुंबई, 13 जून : कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला सिनेमा ‘83’ अभिनेता रणवीर सिंह माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पदुकोण रणवीरच्या कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. ‘83’ सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिका चौथ्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सुरूवातीला दीपिकानं या सिनेमाला नकार दिला होता पण आता मात्र दीपिकानं ती या सिनेमामध्ये रोमी भाटियांची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट केलं.
दीपिकाला एवढ्या चांगल्या भूमिका ऑफर होत असताना तिनं एवढी छोटीशी भूमिका साकारण्यासाठी का तयार झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार दीपिकानं हा सिनेमा दोन कारणांसाठी साइन केला आहे. पहिलं कारण रणवीर आहे आणि दुसरं कारण म्हणजे या सिनेमासाठी दीपिकाला मोठी रक्कम मानधन मिळत आहे.
VIDEO : मध्यरात्री गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सोबत सलमानची सायकल राइड
‘83’ सिनेमाच्या संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका या सिनेमाविषयी दोन बाजूनी विचार करत होती. सहाय्यक भूमिका करावी की नाही याबद्दल तिला शंका होती. पण अखेर तिनं हा सिनेमा स्वीकारला. यामागे कदाचित रणवीर किंवा तिला या सिनेमासाठी मिळत असलेलं मानधन असण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिकानं या सिनेमात रोमी भाटिया यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 14 कोटींचं मानधन घेतलं आहे.
VIDEO : मराठीतील आत्तापर्यंतचं सगळ्यात बोल्ड गाणं रिलीज
View this post on Instagram
सध्या दीपिका ‘83’ च्या शूटिंगसाठी लंडनला पोहोचली असून सिनेमातील बाकी कलाकार अगोदरच या ठीकाणी पोहोचले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या भूमिकेविषयी बोलताना दीपिका म्हणाली, आमच्या वैयक्तिक जीवनातील नात्याचा आमच्या कामावर काही फरक पडत नाही. मला नाही वाटत दुसरा कोणता अभिनेता कपिल देव यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतो. पण जर दुसरा कोणताही अभिनेता ही भूमिका साकारत असताना तरीही मी माझी भूमिका साकारली असती.
घरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा
1983मधील भारतीय संघानं साकारलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला ‘83’ हा सिनेमा 10 एप्रिल 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर आणि दीपिका या रिअल लाइफ कपलनं या सिनेमाच्या अगोदर ‘गोलियों की रासलीला: राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.
MeToo : तनुश्री दत्ता प्रकरणात अभिनेता नाना पाटेकर यांना पोलिसांकडून क्लिनचीट
========================================================================
Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान