मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अप्सरा आली! नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी, स्टेजला लावली आग

अप्सरा आली! नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी, स्टेजला लावली आग

नोरा ही उत्कृष्ट डान्सर आहे. कोणताही डान्स प्रकार ती अगदी सहजरित्या करते. तर यावेळी तिने मराठमोळ्या लावणीवर ताल धरला होता.

  • Published by:  News Digital
मुंबई 6 मे :  सध्याची अत्यंत चर्चेत असणारी अभिनेत्री तसेच उत्कृष्ट नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) पुन्हा एकदा तिच्या हटके अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नोरा ही उत्कृष्ट डान्सर आहे. कोणताही डान्स प्रकार ती अगदी सहजरित्या करते. तर यावेळी तिने मराठमोळ्या लावणीवर ताल धरला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यासाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. ‘डान्स दिवाने 3’ (Dance Deewane 3) या रियॅलिटी शो मध्ये नोरा गेस्ट म्हणून उपस्थित असते. यावेळी एका स्पर्धकाने लावणी सादर केली होती. त्यानंतर नोरा लाही लावणी करण्याचा मोह आवरला नाही.
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणि तिनेही गर्मी या गाण्यावर नृत्य केलं. तेव्हा नोराचा हा लावणी अंदाज पाहून सगळेच थक्क झाले.

लग्न करणं सुगंधा मिश्राला पडलं भारी; आठवड्याभरात दाखल झाली पोलीस तक्रार

नोराचा फार मोठा चाहता वर्ग आहे. तर सोशल मीडियावरही तिची भारीभक्कम फॅन फॉलोइंग आहे. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. नुकताच एका फॅन सोबत तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका फॅन ने तिच्या चेहऱ्याचा टॅटू काढला होता. तर नोरा ही चाहत्यांच हे प्रेम पाहून भारावून गेली होती.
View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

‘दिलबर दिलबर’ (Dilbar Dilbar) या गाण्यानंतर नोरा प्रकाशझोतात आली होती. तिचं ते गाणं फार प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर गर्मी, साकी साकी, कमरिया या हिट गाण्यामध्ये ती झळकली होती. लवकच ती ‘सत्यमेव जयते 2’, ‘भूज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकणार आहे.
First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Nora fatehi

पुढील बातम्या