मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /वयाच्या सहाव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला - अभिनेत्री डेझी इराणी

वयाच्या सहाव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला - अभिनेत्री डेझी इराणी

मी अवघी 6 वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला अशी धक्कादायक माहिती डेझी यांनी मुंबई मिररच्या मुलाखतीत उघड केली आहे.

मी अवघी 6 वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला अशी धक्कादायक माहिती डेझी यांनी मुंबई मिररच्या मुलाखतीत उघड केली आहे.

मी अवघी 6 वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला अशी धक्कादायक माहिती डेझी यांनी मुंबई मिररच्या मुलाखतीत उघड केली आहे.

    23 मार्च : आपल्या अभिनयानं ज्यांनी टेलिव्हिजनसृष्टी आणि सिनेसृष्टी गाजवली अशा ज्येष्ठ अभिनेत्री डेझी इराणी यांनी तब्बल 60 वर्षांनंतर आपल्या दुखांना वाट मोकळी करून दिली आहे. मी अवघी 6 वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला अशी धक्कादायक माहिती डेझी यांनी मुंबई मिररच्या मुलाखतीत उघड केली आहे.

    'मी टू कॅम्पेन' या उपक्रमाअंतर्गत जगभरात लैंगिक शोषणावर मोकळेपणाने बोललं जात असताना डेझी यांनीही त्यांच्या वेदना सगळ्यांसोबत शेअर केल्या आहेत.

    डेझी इराणी म्हणाल्या की,

    "तो माणूस आता जिवंत नाही, तो गेला. त्याचे नाव नझीर होतं. सुप्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबालेवाली यांचा तो नातेवाईक होता. त्यामुळे साहजिकच त्याचे सिनेसृष्टी चांगले संबंध होते. माझ्या आईला कोणत्याही परिस्थितीत मला फिल्मस्टार झालेलं पाहायचं होतं. मी ‘बेबी’ या मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नझीर काका त्यावेळी मद्रासमध्ये सुरु असलेल्या ‘हम पंछी एक डाल के’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी माझ्यासोबत आला होता. मला तो अख्खा प्रसंग तुकड्या तुकड्यांत आठवतोय. पण ती जीवघेणी वेदना अजूनही माझ्या जशीच्या तशी आठवणीत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जसे काही झालेच नाही, अशा भावात पुन्हा स्टुडिओत आले. नझीरने काय केले, हे आईला सांगण्याची हिंमत मला बरीच वर्ष झाली नाही."

    डेझी यांनी पुढे सांगितले, त्या व्यक्तीने मला बेल्टने मारलं आणि माझ्यासोबत दुष्कृत्य केलं. या घटनेविषयी कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारेल, अशी धमकी त्याने मला दिली होती.

    First published:
    top videos

      Tags: Baby Kamala, Baby Saroja, Bala Muralikrishna, Balasaraswati, Daisy Irani, Honey Irani, Kumar Gandharva, MS Subbalakshmi, Ravi Kiran, Shakuntala Devi, Zakir Hussain