मुंबई, 17 मार्च: एका अभिनेत्रीने 42 वर्षीय वेब सीरीज निर्मात्याला (Web Series Producer) हनीट्र्रॅपमध्ये (Honey trap) फसवून त्याच्याकडून 1.6 लाख रुपये लुटल्याची (1.6 Lakh ransom) घटना समोर आली आहे. तसंच अभिनेत्रीने आपल्या मित्रांसोबत मिळून संबंधित वेब सीरीज निर्मात्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी पतंगनगर पोलीस ठाण्यात आरोपी अभिनेत्री आणि तिच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पतंगनगर पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून या घटनेची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित निर्मात्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सांगितलं होतं की, एक अभिनेत्री वेब सीरीजमध्ये काम करू इच्छित आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित वेब सीरीज निर्मात्यानं आरोपी अभिनेत्रीला 6 मार्च रोजी ऑडिशनसाठी बोलावलं आणि दोघांनी एकमेकांशी शाररीक संबंध ठेवला. अभिनेत्री आणि वेब सीरीज निर्मात्याची भेट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या प्रियकराने निर्मात्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप लावले. तसंच वेब सीरीज निर्मात्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
यानंतर वेब सीरीज निर्मात्याने अभिनेत्रीच्या प्रियकराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, त्याने अभिनेत्रीशी परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. पणा याचा काही फायदा झाला नाही. अभिनेत्रीचा प्रियकर पीडित निर्मात्याला फोन करतच राहिला. त्यानंतर आरोपी प्रियकराने वेब सीरीज निर्मात्याला 10 मार्च रोजी घाटकोपर परिसरात भेटायला बोलावलं. यावेळी आरोपी अभिनेत्री आणि तीनही पुरुष साथीदारांनी पीडित निर्मात्याच्या गाडीवर हल्ला केला आणि त्याला मारहाणही केली.
(वाचा - 'वयाच्या 15 व्या वर्षी झाला होता बलात्कार’; प्रियांकाच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा)
यानंतर आरोपी पीडित व्यक्तीला वडाळा आणि सायन याठिकाणी घेऊन गेले. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी पीडित निर्मात्याकडून चार लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींनी यूपीआय अॅपद्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी पीडित व्यक्तीचा फोन हिसकावून घेतला आणि 1.4 लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर आरोपी वेब सीरीज निर्मात्याला जबरदस्तीने एटीएममध्ये घेऊन गेले आणि एटीएममधून 20 हजार रुपये काढण्यास सांगितलं. संबंधित वेब सीरीज निर्मात्यानं 13 मार्च रोजी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण पंतनगर पोलीसांकडे सोपावण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.