'जग्गा-जासूस'मध्ये कतरिनासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीची आत्महत्या

'जग्गा-जासूस'मध्ये कतरिनासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीची आत्महत्या

'जग्गा जासूस'मध्ये कतरिना कैफसोबत बिहू डांस करणारी कलाकार बिदिशा बेजबरूआने आत्महत्या केलीये.

  • Share this:

19 जुलै : 'जग्गा जासूस'मध्ये कतरिना कैफसोबत बिहू डांस करणारी कलाकार बिदिशा बेजबरूआने आत्महत्या केलीये. दिल्लीत राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिदिशा बेजबरूआ मुंबईहुन दिल्लीतील सुशांत लोकमध्ये राहण्यासाठी आली होती. ती एका भाड्याच्या घरात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून  बिदिशाची प्रकृती ठीक नव्हती. ही गोष्ट तिच्या वडिलांना माहिती होती. त्यांनी सोमवारी तिला फोन केला होता पण तीने फोन रिसिव्ह केला नाही. त्याच वेळी त्यांना बिदिशावर संशय आला होता. त्यांनी पोलिसांना फोन करून तिच्या घरचा पत्ता दिला. पोलीस बिदिशाच्या घरी पोहचले असता तिने तोपर्यंत जीवनयात्रा संपवली होती. राहत्या घरात तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बिदिशाने प्रेमविवाह केला होता. पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये भांडणं होतं होती अशी माहिती बिदिशाच्या वडिलांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला असून पुढील चौकशी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 08:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading