गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना भूमी पेडणेकरने केली ही चूक; नेटीझन्स म्हणाले 'ईद मुबारक'

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना भूमी पेडणेकरने केली ही चूक; नेटीझन्स म्हणाले 'ईद मुबारक'

चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट बोलल्यावर काय होतं याचा प्रत्यय नुकताच अभिनेत्री भूमी पेडणेकरला आला.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा 'सोन चिडीयाँ' बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला असला तरी नुकत्याच केलेल्या एका चुकीच्या ट्वीटमुळे ती चर्चेत आली आहे. चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट बोलल्यावर काय होतं याचा प्रत्यय नुकताच भूमीला आला. आज (06 एप्रिल) केलेल्या ट्वीटमुळे भूमीला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे. आज गुढी पाडव्याच्या निमित्तानं भूमीनं सर्वांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं होतं मात्र यावेळी तिनं पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाखातील एक फोटो पोस्ट करत त्याला 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' असं कॅप्शन दिली.

भूमी पेडणेकरनं पाडव्याच्या दिवशी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यानं तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. एका युझरनं म्हटलं अजून सणातील फरक समजत नाही आणि म्हणे मराठी मुलगी. तर दुसऱ्या एका युझरनं तिला चक्क ईदच्या शुभेच्छा देत 'ईद मुबारक' असं म्हटलं आहे. तर इतर अनेकांनी तिला वेगवेगळ्या सणांच्या शुभेच्छा देत तिला ट्रोल केलं. यानंतर आपली चूक लक्षात आल्यावर भूमीनं हे ट्वीट डिलिट केलं. मात्र तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाले होते.

'दम लगा के हैशा' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या भूमी पेडणेकरनं आतापर्यंत 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान', 'लस्ट स्टोरीज' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. या सिनेमांतील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं मात्र नुकताच रिलीज झालेला तिचा 'सोनचिडीयाँ' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सध्या तिचं नाव अभिनेता विकी कौशलशी जोडलं गेल्यानं ती मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भूमी आणि विकी 'तख्त'मध्ये एकत्र दिसणार असून भूमीसाठी विकीनं त्याची गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबत ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे.

First published: April 6, 2019, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading