मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bhargavi Chirmuley: माहोल मुली घेऊन आल्यायेत मराठीची व्हरायटी;भार्गवीचा हा video पाहाच

Bhargavi Chirmuley: माहोल मुली घेऊन आल्यायेत मराठीची व्हरायटी;भार्गवीचा हा video पाहाच

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने बनवलेला मराठी भाषेचा एक खास गोडवा असलेला हा व्हिडिओ सध्या खूप पसंत केला जात आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने बनवलेला मराठी भाषेचा एक खास गोडवा असलेला हा व्हिडिओ सध्या खूप पसंत केला जात आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने बनवलेला मराठी भाषेचा एक खास गोडवा असलेला हा व्हिडिओ सध्या खूप पसंत केला जात आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 09 ऑगस्ट: आपली मराठी भाषा ही अतिशय समृद्ध आहे आणि मराठी भाषेचा अवीट गोडवा दर काही किलोमीटरनी बदलत असतो. प्रत्येक ठिकाणाचा भाषेला मिळणारा एक टच मजा आणून जातो. कधी पुणेरी मराठी कधी वऱ्हाडी बाज असलेली मराठी तर कानडी स्वाद असलेली, कोकणाचा फ्लेवर असलेली अशा अनेक मराठीचे अनेक बाज आणि बोलीभाषा ऐकायला मिळतात. पण आजच्या पिढीच्या अनेक तरुण मुलामुलींना या विविधतेबद्दल कल्पना नसते. सध्या भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री एक खास व्हिडिओ सिरीज याच संदर्भात करताना दिसत आहे. भार्गवी चिरमुले (mahol muli video marathi language) सह अजून तीन देखण्या हिरोईन सुद्धा या उपक्रमाचा भाग आहे. तर या चौघीजणी मिळून ‘माहोल मुली’ नावाने इन्स्टाग्राम रील्स शेअर करत असतात. यामध्ये मराठी प्रमाण भाषेतील काही शब्दांना नेमकं वेगवेगळ्या बोलीभाषांमधे काय म्हटलं जातं? याबद्दल वेगवेगळे खास व्हिडिओ या चौघी नेहमी घेऊन येत असतात. यावेळी हा वऱ्हाडी भाषेतला खास संवाद सुद्धा चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसत आहे. “Maholmuli are back वहावत गेला - बहकला, लटकला - येंगला, मोठ्या डोळ्याची - भोकर डोळी, सगळं सांगतो - सप्पा सांगतो, तुटलं - भसकलं @saii.ranade @samidhaofficial @mrunal_deshpande_ #मराठीवरायटी #माहोलमुली” अशी खास कॅप्शन देत भार्गवीने व्हिडिओमध्ये वापरलेल्या शब्दांचा अर्थ सुद्धा सांगितला आहे.
त्यांच्या या भन्नाट आणि वेगळ्या संकल्पनेला आजपर्यंत बराच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चौघी जणींसह समिधा गुरु या अभिनेत्रीचा नवरा सुद्धा त्यांना हे शब्द शोधून द्यायला मदत करत असतो. आपली मराठी भाषा ही किती समृद्ध आणि परिपूर्ण आहे याचा उत्तम नमुना म्हणून अशा व्हिडिओकडे पाहिलं पाहिजे. सध्या या चौघींच्या या रीलच्या सीरिजला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि असे अनेक व्हिडिओ घेऊन यावेत अशी चाहते नेहमी मागणी करताना दिसून आले आहेत.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या