रणवीर सिंगनं असं काही केलं की भाग्यश्रीच्या मुलाला आठवली 'आई'

रणवीर सिंगनं असं काही केलं की भाग्यश्रीच्या मुलाला आठवली 'आई'

भाग्याश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. त्याच्या पदार्पणाच्या सिनेमाच्या नावाशी संबंधीत हा व्हिडीओ आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : 'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'मर्द को दर्द नहीं होता' या सिनेमाद्वारे तो आपला बॉलिवूड डेब्यू करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलरला प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. पण सध्या व्हायरल होत असलेल्या अभिमन्यूचा हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाच हसू आवरणार नाही आणि असह्य वेदना म्हणजे काय असतं हेही समजेल.

भाग्याश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. त्याच्या पदार्पणाच्या सिनेमाच्या नावाशी संबंधीत हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये अभिमन्यूसोबत 'बाजीराव' रणवीर सिंहसुद्धा दिसत आहे. रणवीर यावेळी अभिमन्यूला जोरदार मुक्का देताना दिसत आहे. त्यानंतर अभिमन्यूची जी अवस्था होते ती पाहिल्यावर तुम्हीही पोट धरुन हसाल. हा व्हिडीओ पोस्ट करताना 'सिंबा सूर्याला भेटतो. वेदना होत नाहीत बाकी सर्व होतंय... तरीही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझा भाऊ आहेस' असं कॅप्शन अभिमन्यूनं व्हिडीओला दिलं आहे.
 

View this post on Instagram
 

@ranveersingh Simmba meets Surya! Dard nahi hota baki sab hota hai still love you bro tu hi Mera Bhai hai


A post shared by Abhimanyu Dassani (@abhimanyud) on

'मर्द को दर्द नहीं होता' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन वसन बाला यांनी केलं आहे तर निर्मिती आरएसव्हीपी यांची आहे. हा सिनेमा येत्या 21 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.


पाहा  : Special Report: पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली

वाचा : 'कलंक'चं पहिलं गाणं प्रदर्शित, 'घर मोरे परदेसीया'नं जिंकली प्रेक्षकांची मनं


==========================================================================================

VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या