Home /News /entertainment /

प्रेग्नंट अनुष्का शर्मानं पहिल्यांदाच व्यक्त केली खंत; आठवला प्रेग्नन्सीआधीचा 'तो' क्षण

प्रेग्नंट अनुष्का शर्मानं पहिल्यांदाच व्यक्त केली खंत; आठवला प्रेग्नन्सीआधीचा 'तो' क्षण

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या तिची प्रेग्नन्सी (Pregnancy) एन्जॉय करत आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या सोशल मीडिया (Social Media) पेज वरून देते. पण प्रेग्नंट अनुष्कानं पहिल्यांदाच खंत व्यक्त केली. ती तिच्या प्रेग्नन्सीपूर्वीच्या कुल लाईफला खूप मिस करते असं दिसून येत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 डिसेंबर : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट टीमचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  जानेवारी 2021 मध्ये आई-वडील होणार आहेत. विराट -अनुष्का आई वडील होणार असल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून दिली होती. तसंच त्यानंतर प्रेग्नंट (Pregnant) अनुष्काने प्रेग्नन्सीदरम्यान (Pregnancy) आपल्या आनंदाच्या क्षणांचे फोटो सोशल मीडियावरच शेअर केले होते. पण अनुष्कानं प्रेग्नन्सीमध्ये पहिल्यांदाच आपली खंत व्यक्त केली आहे. अनुष्का शर्मा तिची प्रेग्नन्सी  एन्जॉय करत आहे. पण आज अनुष्काने तिचा थ्रोबॅक फोटो  पोस्ट केला आहे. फोटोतील हा क्षण आपण खूप मिस करत आहोत.  या फोटोत आपण जे करत आहोत ते प्रेग्नन्सीमुळे आता आपल्यालाला करायला मिळत नाही, असं अनुष्का म्हणाली.
  इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या या फोटोत अनुष्का निवांत बसून खाताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्का म्हणाली,  "एक वेळ अशी होती जेव्हा मी असं बसून खाऊ शकत होते,  आता मी असे बसू शकत नाही पण खाऊ शकते" अनुष्काची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या जोरदार वायरल होत आहे. अगदी काही तासातच या फोटोवर लाखो लाईक्स मिळाले आहेत. या फोटोवर फक्त  तिच्या चाहत्यांचे लाईक्स-कंमेंट्स (Likes)(Comments) नाहीत तर सेलेब्रिटींनीही (Celebrity) यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे वाचा - 45 वर्षाची एकता कपूर करणार लग्न? 'मिस्ट्री मॅन'सोबतचा PHOTO व्हायरल काही दिवसांपूर्वी अनुष्काने एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये ती शीर्षासन करत होती. या फोटोत  विराटही तिच्यासोबत दिसला होता. सोशल मीडियावर हा फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
  यंदा सर्वाधिक आवडणाऱ्या ट्विटचा मान विराट आणि अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या (Virat and Anushka) घोषणेनं मिळवला आहे. ट्विटर इंडियानं (Twitter India) त्यांच्या वार्षिक आढाव्यानंतर विराटने अनुष्का प्रेग्नंट असल्याचे केलेलं ट्वीट या वर्षीचं सर्वाधिक आवडतं ट्वीट ठरल्याचं जाहीर केलं आहे. 27 ऑगस्ट रोजी विराट आणि अनुष्का यांनी इन्स्टाग्राम आणि  ट्विटरवर जानेवारी 2021 मध्ये आपलं बाळ जन्माला येणार असल्याचं सांगितलं. ‘अँड वी आर थ्री! अरायव्हिंग जानेवारी 2021’ अशा कॅप्शनसह दोघांनी आपला एक फोटो शेअर केला होता. आठ डिसेंबर रोजी ट्विटर इंडियानं विराट-अनुष्काचं हे गोड बातमी देणारं ट्विट यंदा सर्वाधिक रीट्विट झालेलं, लोकप्रिय ट्विट असल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असणार कपल विराट आणि अनुष्काने जगातल्या टॉप 25 इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्समध्ये (Top 25 Global Instagram Influencers)  स्थान पटकावलं आहे. विराट या यादीत 11व्या स्थानावर तर अनुष्का शर्मा या यादीमध्ये 24व्या स्थानावर आहे.या संदर्भात जगभरातील माहिती एकत्रित करून तिचं विश्लेषण करणाऱ्या 'हाइप ऑडिटर' (Hype Auditor) नावाच्या संस्थेनं ही यादी तयार केली आहे. हे वाचा - 'देवाने आपल्याला...' न्यूड PHOTOSHOOT वरील टीकेवर मिलिंद सोमणने सोडलं मौन 11 डिसेंबर 2020 रोजी विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. 2017मध्ये लग्न या सेलिब्रिटी कपलने लग्न केलं. जानेवारी 2021मध्ये त्यांच्या बाळाचा जन्म होणार आहे. कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, 17 डिसेंबरला सुरू होणार असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळून तो भारतात परतणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Anushka sharma, Instagram, Pregnancy, Pregnant, Pregnant woman, Social media, Virat kohali

  पुढील बातम्या