Home /News /entertainment /

...आणि जळाले अभिनेत्रीच्या नाकातले केस! धम्माल VIDEO एकदा पाहाच

...आणि जळाले अभिनेत्रीच्या नाकातले केस! धम्माल VIDEO एकदा पाहाच

...आणि जळाले अभिनेत्रीच्या नाकातले केस! धम्माल VIDEO एकदा पाहाच

...आणि जळाले अभिनेत्रीच्या नाकातले केस! धम्माल VIDEO एकदा पाहाच

लगोरी फेम अभिनेत्रींनी एक धम्माल रिल व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  मुंबई, 23 जून:  रिल्स व्हिडीओ (Reels Video)  काढण्यासाठी केवळ रिल स्टारचं उत्साही नसतात तर आजकाल कलाकारही धम्माल रिल्स व्हिडीओ करताना दिसतात. मग ते रिल्स तयार करण्यासाठी कोण काय करेल आणि काय नाही हे सांगता येत नाही. रिल्स तयार करण्यासाठी टेलिव्हजनच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी प्रयत्न केलाय. ब्यूटी शॉर्ट काढण्यासाठी त्यांनी वापरलेली ट्रिक अभिनेत्रींच्या अंगलट आली आणि त्यानंतर जे काही झालं हे रिलमध्ये शुट करण्यात आलं आहे. अभिनेत्रींचा हा धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लगोरी (lagori Serial) फेम अभिनेत्री रेशमा शिंदे (Reshma Shinde) अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) आणि अनुजा साठे ( Anuja Sathe)  यांनी रियुनियन करत धम्माल मस्ती केली. अभिनेत्री अनुजा साठ्ये हिनं व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात 'उफ्फ तेरी अदा' या गाण्यावर अभिनेत्री स्टाईल मारताना दिसत आहेत. ब्यूटी शॉर्टसाठी त्यांनी हेअर ड्रायरचा उपयोग केलाय. तिघींचे केस ड्रायरच्या हवेने मस्त उडताना दिसतायत. मात्र मध्येच हेअर ड्रायरची गरम हवा अभिनेत्री रेशमा शिंदेच्या नाकात जाते. आणि ती 'माझ्या नाकातले केस जळाले', असं म्हणते. तिघींचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेलं नाही. हेही वाचा - मला राजकन्या झाल्यासारखं वाटतंय...! सारा तेंडूलकरची पोस्ट चर्चेत
  अनुजानं ही रिल व्हिडीओ शेअर करत भन्नाट कॅप्शनही शेअर केलं आहे. तिनं म्हटलंय, 'तुम्हाला मस्त ब्यूटी शॉर्ट हवा असतो आणि ती मध्येच म्हणते नाकातले केस जळाल'.  या निमित्तानं या तिघींचा क्रेझीनेस त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेलिव्हिजनवर अनेक मालिका येताता आणि जातात. नव्या कामांनिमित्त अनेक कलाकार नव्याने एकमेकांना भेटतात एकत्र काम करतात. त्यातले अनेक कलाकार त्यांच्या कामापूर्ते बरोबर राहतात मात्र काही कलाकार इतके छान मित्र होतात की काम संपल्यावरही वर्षानुवर्ष त्यांची मैत्री तितकीच घट्ट राहते. अशीच मैत्रीची लगोरी ज्या अभिनेत्रींनी आजपर्यंत जपून ठेवली आहे त्या अभिनेत्री लगोरी मालिकेतील रेशमा शिंदे, अभिज्ञा भावे आणि अनुजा साठ्ये. तिघी आजही फार चांगला मैत्रिणी आहेत. कामाच्या व्यापातून तिघीही एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढतात.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Tv actress, Tv celebrities, TV serials

  पुढील बातम्या