अनुजानं ही रिल व्हिडीओ शेअर करत भन्नाट कॅप्शनही शेअर केलं आहे. तिनं म्हटलंय, 'तुम्हाला मस्त ब्यूटी शॉर्ट हवा असतो आणि ती मध्येच म्हणते नाकातले केस जळाल'. या निमित्तानं या तिघींचा क्रेझीनेस त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेलिव्हिजनवर अनेक मालिका येताता आणि जातात. नव्या कामांनिमित्त अनेक कलाकार नव्याने एकमेकांना भेटतात एकत्र काम करतात. त्यातले अनेक कलाकार त्यांच्या कामापूर्ते बरोबर राहतात मात्र काही कलाकार इतके छान मित्र होतात की काम संपल्यावरही वर्षानुवर्ष त्यांची मैत्री तितकीच घट्ट राहते. अशीच मैत्रीची लगोरी ज्या अभिनेत्रींनी आजपर्यंत जपून ठेवली आहे त्या अभिनेत्री लगोरी मालिकेतील रेशमा शिंदे, अभिज्ञा भावे आणि अनुजा साठ्ये. तिघी आजही फार चांगला मैत्रिणी आहेत. कामाच्या व्यापातून तिघीही एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Tv actress, Tv celebrities, TV serials