अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने सुशांत सिंह राजपूतबाबत पहिल्यांदा शेअर केली अशी पोस्ट

अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने सुशांत सिंह राजपूतबाबत पहिल्यांदा शेअर केली अशी पोस्ट

सुशांतच्या निधनानंतर आज पहिल्यांदा अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) बॉयफ्रेंड विक्की जैन (Vicky Jain) याने सुशांतबाबत पोस्ट शेअर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) मृत्यूप्रकरण जसजसे पुढे जात आहे, तसतसे नवीन खुलासे यामध्ये होत आहेत. त्याचप्रमाणे काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. 14 जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये मृतावस्थेत सापडला होता. मुंबई पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये सुशांतने आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. सुशांतला जाऊन आज एकूण 2 महिने पूर्ण झाले आहेत. सुशांतच्या निधनानंतर आज पहिल्यांदा अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) बॉयफ्रेंड विक्की जैन (Vicky Jain) याने सुशांतबाबत पोस्ट शेअर केली आहे.

सुशांत सिंह राजपूतसाठी विक्कीने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'तुम्हाला सर्वांना विनंती आहे की 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुशांत सिंह राजपूतच्या प्रेयर मीटमध्ये अवश्य सहभागी व्हा.'

विक्कीच्या या पोस्टवर अंकिताने हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. सुशांतला जाऊन आज दोन महिने पूर्ण झाल्यानंतर अंकिता लोखंडे हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने देखील या ग्लोबर प्रेयरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

(हे वाचा-सुशांतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण, कुटुंबीयांनी जारी केले UNSEEN VIDEO)

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती तिच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय चौकशीच व्हावी अशी मागणी करत आहे. अंकिता लोखंडे हिने देखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत हिच मागणी केली आहे. सुशांतच्या बहिणीने 15 ऑगस्ट रोजी या ग्लोबल प्रेयर मीटचे आयोजन केले आहे. या प्रार्थना सभेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन तिने केले आहे.

First published: August 14, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या