SSR Death Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अंकिता लोखंडे म्हणाली...

SSR Death Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अंकिता लोखंडे म्हणाली...

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput) रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. यापूर्वी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने एक ट्वीट केले आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput) रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. रियाविरोधात पाटणामध्ये दाखल एफआयआर मुंबईमध्ये हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर आज निकाल देण्यात येणार आहे. न्यायाधीश ऋषिकेश रॉय यांनी या याचिकेवर 11 ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण केली होती. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे काही गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

सुशांतचे वडील केके सिंग (KK Singh) यांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर अभिनेत्रीने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास बिहारमधून मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर केला जावा, अशी मागणी करणारी पहिली याचिका रियाने 29 जुलै रोजी दाखल केली होती. तर 10 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलेल्या दुसर्‍या याचिकेमध्ये ती म्हणाली की सुशांतच्या मृत्यूसाठी माध्यमांकडून तिला दोषी ठरवत आहे. अन्यायकारकपणे 'मीडिया ट्रायल' सुरू असल्याचे यामध्ये तिने म्हटले होते.

(हे वाचा-"सुशांतच्या बहिणीने नशेत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", रियाचा खळबळजनक आरोप)

दरम्यान सुशांतची एक्स गलफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी ट्वीट केले आहे. सुशांतला न्याय मिळण्याची वाट पाहतेय, अशा आशयाचे ट्वीट तिने केले आहे. तिने यामध्ये केवळ 'Waiting... #JusticeForSushant' असे ट्वीट केले आहे.

त्याचप्रमाणे सुशांतची बहिण श्वेत सिंह किर्तीने देखील महाभारतातील एक फोटो पोस्ट केला आहे. 'आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चला! शरणागती..#GlobalPrayers4SSR #Godiswithus', अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांकडून याप्रकरणी वारंवार सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.

View this post on Instagram

‪Lead Us from darkness unto LIGHT! Sharnagati 🙏 #GlobalPrayers4SSR #Godiswithus ‬

A post shared by Shweta Singh kirti (@shwetasinghkirti) on

दरम्यान मुंबई पोलीस विविध घटना लक्षात घेत या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिहार सरकारने न्यायालयात असे म्हटले होते की, राजकीय दबावामुळे मुंबई पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक केस देखील दाखल केली नाही. तर महाराष्ट्र सरकारकडून असा युक्तिवाद करण्यात आला होता की, याप्रकरणी बोलण्यास बिहार सरकारला अधिकार नाही.

(हे वाचा-मृत्यू प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीला मोठा झटका; फिल्ममध्ये मिळणार नाही काम)

अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडून लेखी जबाब देखील नोंदवण्यात आला होता. यामध्ये तिने असे म्हटले होते की सुशांतच्या मृत्यूशी तिचा काही संबंध नाही आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 19, 2020, 11:00 AM IST

ताज्या बातम्या