Home /News /entertainment /

‘दुनियेशी मला घेणदेणं नाही’; ट्रोलर्सला उत्तर देत सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंडनं केली लग्नाची घोषणा

‘दुनियेशी मला घेणदेणं नाही’; ट्रोलर्सला उत्तर देत सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंडनं केली लग्नाची घोषणा

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड लवकरच अडकतेय लग्नबंधनात; ट्रोलर्सला टोला देत केली डेस्टिनेशन वेडिंगची घोषणा

  मुंबई 15 मे : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची (Sushant Singh Rajput) पूर्व प्रेयसी आणि प्रसिद्ध टिव्ही तसेच बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच विवाह करणार आहे. अंकिताने स्वतःच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. सुशांत शी ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्ष अंकिता हि सिंगल होती. तर आपण त्यानंतर मानसिक तणावातून गेल्याचं तिने सांगितलं होतं. 2016 मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले होते. तर तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नही करणार होते पण काही कारणाने ते विभक्त झाले होते. त्यावंतर अंकिता विकी जैन (Vicky Jain) या व्यक्तिला डेट करू लागली. विकी हा एक उद्योजक आहे.
  दोघांच्याही नात्याला आता काही वर्षे उलटली आहेत. व आता त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा  केला आहे. तिने सांगितलं की “प्रेम ही माझी गरज आहे. जसं जेवन ही गरज असते तसच प्रेम ही माझी गरज आहे.”

  अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या वर्गमैत्रीणी; शाळेतील जुने फोटो होतायेत व्हायरल

  अंकिताने त्यांच्या नात्याविषयी आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ती म्हणाली, “मी कुठेही जाऊ, काम करू मला माझा पार्टनर माझ्या सोबत पाहिजे, बाकी दुनियेशी मला घेणदेणं नाही. आम्ही दोघे एकत्र बसून चहा जरी पित असू तरी ते माझ्यासाठी खूप आहे. माझ्या प्रियकरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे.”
  लग्नाविषयी बोलताना ती म्हणाली, “आमचं लग्न जोधपूर किंवा जयपूर मध्. होईल. अजून काहीच ठरलं नाही. पण मला राजस्थानी पद्धतीने लग्न करायचं आहे.” शेवची अंकिताने सुशांतचाही उल्लेख केला. ती म्हणाली, “सुशांत माझा फेवरेट स्टार आहे. पवित्र रिश्ता मध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे. आणि तो माझा आवडता अभिनेता आहे.”
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Ankita lokhande, Entertainment, Sushant sing rajput

  पुढील बातम्या