'सुशांत नाही तर मीच भरते माझ्या घराचे हप्ते', अंकिता लोखंडेने शेअर केलं बँक स्टेटमेंट

'सुशांत नाही तर मीच भरते माझ्या घराचे हप्ते', अंकिता लोखंडेने शेअर केलं बँक स्टेटमेंट

शुक्रवारी अशी माहिती समोर आली होती की, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) मुंबईतील घराचे हप्ते भरत होता. अभिनेत्रीने ही बाब फेटाळली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूरकरणी (Sushant Singh Rajput Death) रोज समोर येणारे खुलासे हे प्रकरण एक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवत आहेत. दरम्यान शुक्रवारी अशी माहिती समोर येत होती की, सुशांत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) मुंबईतील घराचे हप्ते भरत होता. अभिनेत्रीने ही बाब फेटाळली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने असे म्हटले आहे की, 'मालाडमध्ये मी राहते तो फ्लॅट माझ्या नावावरच असून या घराचे बॅंकेचे हफ्ते मी माझ्या खात्यातून भरले आहेत.'

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक प्रसार माध्यमांमध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशीच एक बाब समोर आली होती की, सुशांतच्या नावावर असलेला फ्लॅट आणि त्यात अंकिता राहते त्या फ्लॅटचे बॅंकेचे कोट्यावधींचे हफ्ते सुशांतच्या खात्यातुन वळते झालेत. अंकिताने यावर उत्तर देताना एक ट्वीट शेअर केले आहे. 'ते घर माझ्याच नावावर असून या घराचे बॅंकेचे हफ्ते मी माझ्या खात्यातून भरले आहेत', असे यावेळी अंकिताने म्हटले आहे.

हे वाचा-अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने सुशांतबाबत पहिल्यांदा शेअर केली अशी पोस्ट

यावेळी तिने घराचे नोंदणीपत्र आणि तिच्या बॅंक खात्यातून पैसे बॅंकेने कापून घेतल्याच्या पासबूक मधील नोंदी अंकिताने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

'दर महिन्याला माझ्या खातात्यून पैसे जातात ते मी अधोरेखित केले आहे आणि याव्यतिरिक्त माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही', असे ट्वीट यावेळी अंकिताने केले आहे.

हे वाचा-सुशांत आजारी असूनही पार्टी करायची रिया चक्रवर्ती, ड्रायव्हरने केले मोठे खुलासे?

काही मीडिया अहवालात असे सांगण्यात आले होते की, सुशांतने मालाडमध्ये 4.5 कोटी रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी केला होता ज्याचा ईएमआय तो भरत होता. हा फ्लॅट तोच आहे, ज्यामध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता राहते. ईडीच्या चौकशीत रियाने या घराचा उल्लेख केला होता. रिया म्हणाली, "सुशांतच्या या फ्लॅटमध्ये अंकिता राहत होती आणि सुशांतला किती वाटलं तरी तो फ्लॅट तिला सोडायला सांगू शकत नव्हता. या फ्लॅटचा ईएमआय सुशांतच भरत होता"

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 15, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या