कोलकाता, 09 जून : बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी (Nusrat Jahan) पती निखिल जैन (Nikil Jain) पासून विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे. याबाबत तिनं एक निवेदन काढून आपण आणि निखिल जैन यांच्यामध्ये कोणतेही वैवाहिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक घटना आहे.
नुसरत जहाँ यांचे (Nusrat Jahan) निखिलशी वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. नुसरत जहा आणि निखिल जैन यांचे तुर्कीच्या बोड्रम येथे गेल्या वर्षी 19 जून रोजी लग्न झाले होते आणि त्यांचे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरले होते. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
नुसरत जहा यांनी आज एका निवेदनाद्वारे सांगितले की, आमचे लग्न तुर्की विवाह नोंदणी अंतर्गत झाले आहे आणि हा विवाह सोहळा पूर्णपणे अवैध ठरला होता. कारण हे दुसर्या एका धर्मातील व्यक्तीशी लग्न होते आणि सामाजिक विवाह कायद्यानुसार याची अधिकृत नोंदणी होणं गरजेचं होतं, पण ती झाली नव्हती. यामुळे या लग्नाला काहीही अर्थ नव्हता. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो.
Being on foreign land, as per Turkish Marriage Regulation, ceremony is invalid. It was interfaith marriage, it requires validation under Special Marriage Act, which didn't happen. As per Court of Law, it's not marriage but relationship/live-in: Nusrat Jahan, TMC issues statement pic.twitter.com/c9gi82vg8r
— ANI (@ANI) June 9, 2021
आमच्यातील वेगळेपण खूप पूर्वीपासून जाणवू लागले होते. मात्र, आत्तापर्यंत याचा उघडपणे खुलासा झाला नव्हता.
सहा महिन्यांपासून ते स्वतंत्र राहत होते
नुसरत जहा सहा महिन्यांपासून पतीपासून विभक्त राहत होती. तिच्या पतीनेही दिवाणी खटला दाखल केला होता. ते म्हणाले होते की, ज्या दिवशी मला कळले की नुसरत माझ्याबरोबर राहू इच्छित नाही. तिला इतर कोणाबरोबर राहायचे आहे. त्याच दिवशी मी दिवाणी खटला चालविला. भविष्यात नुसरतशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत, असं निखिलनं स्पष्टपणे सांगितलं. नुसरत जहा म्हणाली, की त्यांचा विवाह हा कायदेशीरदृष्टीने मान्य झालेला नाही. मधल्या काळात सर्व सहली किंवा बिझिनेस टूर झाल्या होत्या, त्यासाठी सर्व खर्च आपण स्वत: उचलला होता.
लवकरच पतीविरूद्ध गुन्हा दाखल करेन
नुसरत जहाने 10-मुद्द्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, ती स्वत: बहीण आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेत आहे, त्यांच्यासाठी खर्च करत आहे. परंतु, काही लोक त्यासाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी कोणाचेही क्रेडिट कार्ड वापरत नाही. कोणीतरी असा दावा करतो, की तो श्रीमंत आहे. मी त्याच्या खात्यातून पैसे वापरतो. त्यांच्याबद्दल असे सांगितले गेले आहे. यासंदर्भात ती बँक प्रशासनाशी बोलणार असून लवकरच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, TMC, West bengal