मुंबई, 8 नोव्हेंबर- 'बिग बॉस 13' मध्ये हिमांशी खुराना (himanshi khurana) आणि असिम रियाझ (asim riaz) यांचे सूर जुळले. तेव्हापासून ते आजपर्यंत हे दोघे एकत्र आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दोघांची प्रेमकहाणी आजही चर्चेत आहे. हिमांशीने (himanshi khurana)अलीकडेच असिम रियाझसोबतच्या तिच्या असलेल्या रिलेशनशिप व लग्नाविषयी मोकळेपणाने सांगितलं. दोघांनाही लवकर लग्न करण्याची गडबड नाही कारण दोघही करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचे तिनं सांगितलं आहे.
हिमांशी खुराना म्हणते की, रिअॅलिटी शोनंतर आम्हा दोघांची वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात देखील खूप प्रगती झाली आहे. असिमचे अनेक उत्कृष्ट म्युझिक व्हिडीओ रिलीज झाले आहेत जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळाले आहे. मला असिमचा खूप अभिमान आहे. तो खूप अॅक्टीव आहे आणि नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या शोधात असतो. त्यांच्याबद्दलची तीच गोष्ट मला खूप आवडते.
वाचा : अमोल कोल्हे यांनी घेतला एकांतवासात जाण्याचा निर्णय; 'हे' आहे कारण
हिमांशी पुढे म्हणाली की, यावेळी दोघंही व्यावसायिक जीवनाला म्हणजे करिअरला प्राधान्य देत आहे. लग्नाची वाट पाहता येईल. मी सध्या फक्त काहीतरी नवीन गोष्टी शोधण्याच्या व करण्याच्या प्रयत्नात असते. तर असिमच्या करिअरला नुकतीच सुरुवात झाली आहे. अनेकवेळा जेव्हा मी लव्ह लाईफबाबत ट्रोलच्या निशाण्यावर येतो तेव्हा मला विचित्र वाटते. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन याच्यामध्ये खूप मोठी भिंत असते जी लोकांनी समजून घेणं गरजेचं असल्याचं हिमांशी हिनं यावेळी सांगितलं.
वाचा : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जेठालालच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन; फॅमिली फोटो
याशिवाय हिमांशी म्हणाली की, मला भविष्यात ओटीटी प्रोजेक्ट्स करायचे आहेत, पण इंटिमेट सीन्स करण्यास मला कम्फर्टेबल वाटत नाही. यामुळे मी अनेक ऑफर्स नाकारल्या आहेत. ओटीटीवर बोल्ड आणि इंटिमेट सीन देणं गरजेचं झालं आहे, पण मी ते करू शकत नाही. ही दृश्ये माझ्या स्वत:ची निवड असल्याने कोणीही मला जबरदस्ती करू शकत नाही. मला अशा कामाचा भाग बनायचे नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bollywood, Bollywood News, Entertainment