मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दबंग सलमानचा हा VIDEO पाहिलात का? नवं रूप पाहून बसेल सुखद धक्का

दबंग सलमानचा हा VIDEO पाहिलात का? नवं रूप पाहून बसेल सुखद धक्का

सलमान खालची कुठलीही अदा त्याच्या चाहत्यांना मोहात पाडते. या व्हिडीओतही तो जे काही करतो आहे ते नक्कीच लक्ष वेधून घेणारं आहे.

सलमान खालची कुठलीही अदा त्याच्या चाहत्यांना मोहात पाडते. या व्हिडीओतही तो जे काही करतो आहे ते नक्कीच लक्ष वेधून घेणारं आहे.

सलमान खालची कुठलीही अदा त्याच्या चाहत्यांना मोहात पाडते. या व्हिडीओतही तो जे काही करतो आहे ते नक्कीच लक्ष वेधून घेणारं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 डिसेंबर : बॉलिवूडचा दबंग मॅन सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस. सलमान आज 55 वर्षांचा झाला आहे. सलमानचे असंख्य चाहते देशविदेशात पसरलेले आहेत.

आज वाढदिवसानिमित्त चाहतेमंडळी आपल्या आवडत्या हिरोला विविध पद्धतीनं शुभेच्छा देत आहेत. यात सलमानच्या अगदी आतल्या वर्तुळातले म्हणवले जाणारे लोकही आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री बीना काक (Bina Kak).

बीना काक यांना सलमानची पडद्यावरची आई अर्थात रील मदर (Reel Mother) म्हणून ओळखलं जातं. त्या राजकारणातही सक्रीय आहेत. त्यांनी सलमानचा कुकिंग करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून शेअर केला आहे. यात बीना काक आणि सलमान दोघे मिळून कुकिंग (cooking) करत आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'गुरू सेर तो चेला सवा सेर. सलमान जयपूरला घरी आला असताना जेवण बनवतो आहे. अर्थात, ही जुनी गोष्ट. मी तुझ्या पुन्हा एकदा येण्याची आतुरतेने वाट बघते आहे. सलमान, तुला जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या खूप सदिच्छा! इतर सगळ्यांनाही येणारा काळ आनंदी आणि निरोगी जावो. काळजी आणि चिंतामुक्त जावो. सुरक्षित आणि निरोगी रहा!'

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">गुरु सेर तो चेला सवा सेर।Salman cooking desi style while his stay at home in Jaipur,Can&#39;t wait to have you back .Wishing you a very happy birthday SK .Wishing everyone else happier n healthier times ahead .Free of tension , worries .Stay safe n healthy ..<a href="https://twitter.com/BeingSalmanKhan?ref_src=twsrc%5Etfw">@BeingSalmanKhan</a> <a href="https://t.co/WLqTkeowAG">pic.twitter.com/WLqTkeowAG</a></p>&mdash; Bina kak (@binaakak) <a href="https://twitter.com/binaakak/status/1342921211676819456?ref_src=twsrc%5Etfw">December 26, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

बीना काक यांना सलमानच्या निकटवर्तीयांपैकी एक मानलं जातं. त्या सलमानला भाऊ मानतात. सलमान जयपूरला गेल्यानंतर बीना काक यांना भेटल्याशिवाय जात नाही. बीना यांनी आज सलमानच्या वाढदिवशी दोन पोस्ट लिहिल्या. यात पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी सलमानसोबत स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे आणि दुसऱ्या पोस्टमध्ये कुकिंग व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सलमाननंच दिली होती आईची भूमिका

सलमानही बीना काक यांचा खूप आदर करतो. विशेष हे, की बीना यांनी राजकारणात आपली ओळख निर्माण केल्यावर सलमानानेच त्यांना 2005 मध्ये 'मैने प्यार क्यू किया' मध्ये आईची भूमिका दिली होती. यानंतर 2008 मध्ये पुन्हा एकदा 'गॉड तुस्सी ग्रेट हो' मध्ये बीना यांनी आईची भूमिका केली. याशिवाय त्यांनी 'नन्हे जैसलमेर', 'दुल्हा मिल गया', 'जॉनी सर' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

First published:

Tags: Salman khan, Twitter