मुंबई 01 मार्च : हिंदी चित्रपटसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर (Kirron Kher) यांना ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाला आहे. सध्या त्या मुंबईत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण खेर या चंदीगड येथील भाजपच्या खासदार आहेत. 31 मार्चला खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी उत्तर दिलं. याच दरम्यान त्यांनी किरण यांना ब्लड कॅन्सर असल्याचंही सांगितलं. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
किरण खेर (Kirron Kher) यांनी मल्टीपल मायलोमा आहे, हा एक प्रकारचा रक्ताचा क्षयरोग आहे. सध्या किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. अद्याप अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बुधवारी 31 मार्चला घेण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत बोलताना अरुण सूद म्हणाले, की 68 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री णि खासदार किरण खेर यांना मागील वर्षीच आपल्या या आजाराबद्दल माहिती झालं होतं. उपचारानंतर आता त्या ठीक होत आहेत. याच कारणामुळे पुढील काही दिवस त्या शहरात येऊ शकत नाहीत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सूद यांनी सांगितलं.
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच किरण खेर यांच्या या आजाराबद्दल माहिती मिळाली होती. तेव्हा त्या आपल्या चंदीगडमधील घरी होत्या मात्र, मल्टीपल मायलोमाबद्दल माहिती होताच त्यांना उपचारासाठी चार डिसेंबरला मुंबईला घेऊन जाण्यात आलं. अभिनेत्री किरण यांनी 1990 साली सरदारी बेगम या श्याम बेनेगल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. इतकंच नाही तर बैरीवाली या बंगाली चित्रपटासाठी अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Bollywood, Bollywood actress, Cancer, Mp, Shocking news