मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमृताला झाली बाप्पाच्या आगमनाची घाई; शेयर केला मजेशीर VIDEO

अमृताला झाली बाप्पाच्या आगमनाची घाई; शेयर केला मजेशीर VIDEO

नुकताच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बाप्पाला भेटण्याची आपल्याला किती घाई लागली आहे, यावर एक मजेशीर व्हिडीओ शेयर केला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, ९ सप्टेंबर- सध्या सर्वत्र आनंदी वातावरण आहे. कारणही तितकंच खास आहे. आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा (Ganesh Chaturthi 2021) आत्ता विराजमान होणार आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते कलाकरांपर्यंत सर्वांनाच आपल्या बाप्पाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने(Amruta Khanvilkar) नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये अमृताने बाप्पाला भेटण्याची कशी ओढ लागली आहे, याचा एक मजेशीर रील बनवला आहे.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांचा मनोरंजन करत असते. नुकताच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बाप्पाला भेटण्याची आपल्याला किती घाई लागली आहे, यावर एक मजेशीर व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये अमृता कधी सोफ्यावर बसून, तर कधी खिडकीत उभी राहून तर कधी दारात येऊन बापाची वाट पाहात आहे. अमृताने यामध्ये खूपच सुंदर आणि मजेशीर एक्स्प्रेशन दिले आहेत.

(हे वाचा:अदिती नव्याने पडणार सिद्धार्थच्या प्रेमात; 'तुझ्या माझ्या संसाराला..'मध्ये नाती)

शिवाय या व्हिडीओमध्ये अमृता पारंपरिक गुलाबी रंगाच्या काठपदर साडीमध्ये दिसून येत आहे. या लूकमध्ये अमृता मराठी मुलगी शोभून दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवरून तिला बाप्पाच्या आगमनाची किती घाई झाली आहे, हेच दिसून येत. १० सप्टेंबरला गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण मोठी मेहनत घेत आहेत.

गणपतीला 'विघ्नहर्ता'म्हणून संबोधलं जात. त्याच्या येण्याने सर्व दुःख सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्यामध्ये गणेशोत्सवाचं महत्व अनन्यसाधारण आहे. बाप्पाचा आगमन होणार असल्याने वातावरण अगदी प्रसन्न झालं आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment