मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'अमृतकले'तून घडणार विठूरायाचं दर्शन! आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्रीची चाहत्यांना खास भेट

'अमृतकले'तून घडणार विठूरायाचं दर्शन! आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्रीची चाहत्यांना खास भेट

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अमृत कला’ प्रस्तुत एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अमृत कला’ प्रस्तुत एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अमृत कला’ प्रस्तुत एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 जुलै- अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आपल्या ‘अमृत कला’ मार्फत विविध डान्स सादर करत असते. यामध्ये कोरियोग्राफर आशिष पाटील (Aashish Patil) तिला यामध्ये साथ देत असतो. सध्या एकादशी जवळ आली आहे. सर्व भक्तांना विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागली आहे. मात्र कोरोना महामारीमध्ये यावेळीही वारी होणार नाही. मात्र सर्व लोक आपापल्या पद्धतीने विठू माऊलीचं दर्शन घेत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या कलेच्या माध्यमातून विठू माऊलीचं दर्शन घेतलं आहे. अमृताने ‘माऊली माऊली’ (Mauli Mauli) या गाण्यावर एक सुंदर डान्स व्हिडीओ शेयर केला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अमृत कला’ प्रस्तुत एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. खास एकदिशी निमित्त तिने हा व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती आशिष पाटीलसोबत ‘माऊली माऊली’ या गाण्यावर डान्स सादर केला आहे. यामध्ये अमृता आणि आशिष विठूरायाचं दर्शन घेऊन आपल्या डान्सला सुरुवात करताना दिसतात. दोघेही हातात भगवा झेंडा घेऊन सुंदर असं नृत्य करत आहेत. सर्वांनाचं विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व लोक आपआपल्या घरी राहून तेथूनचं विठोबाचं दर्शन घेत आहेत. तर अमृतासारखे कलाकार आपल्या कलेतून विठूरायाचं स्मरण करत आहेत.

(हे वाचा:VIDEO: 'खुलता कळी खुलेना' ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी  )

अमृता खानविलकर आणि आशिष पाटील दोघे मिळून दररोज नवनवे डान्स व्हिडीओ शेयर करत असतात. अमृता आणि आशिषने मिळून ‘अमृत कला’ ही डान्स सिरीज सुरु केली आहे. यामध्ये ते खुपचं सुंदर डान्स सादर करत आहेत. चाहतेही याला भरभरून दाद देत आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून चाहतेही विठूरायाच्या स्मरणात व्यग्र झाले आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment