या दरम्यान अमृताने एक मुलाखत दिली ती म्हणाली, “मला खूप आनंद होतो की निर्माते मला एक अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत. मग ते कोणत्याही प्रकारचं काम असो. ते नेहमी माझ्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून येतात, वेगळी पात्र घेऊन येतात. आणि मी याविषयी खूप आनंदी आहे.”View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “मराठी किंवा हिंदी अशी कोणतीच चित्रपटांची सीमा नाही. सगळया सीमा या बदलणाऱ्या आहेत. प्रत्येकजण स्वतःचं चांगल काम देण्याचा प्रयत्न करत असतो. इथे फक्त चांगले आणि वाईट चित्रपट असतात.” तर पुढे विविध भाषेतील चित्रपटांविषयी बोलताना ती म्हणाली, “भाषा हा माझ्यासाठी कधीच अडथळा नव्हता. सगळं काही त्या पात्रावर अवलंबून असंत. एक चांगला कलाकार तेव्हाच चमकतो जेव्हा आशय चांगला असतो,” अमृता म्हणाली.View this post on Instagram
रिचा-अलीनं बांधली लग्नगाठ? फोटोंमुळं ट्रोल होताच डिलीट केली ती पोस्ट
मराठी, हिंदी व्यतिरिक्त तिने मल्याळम आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांतही काम केलं आहे. प्रत्येकवेळी अमृताने स्वतःला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं आहे. अमृताचा ‘दिठी’ हा चित्रपट सोनी लिव्हवर स्ट्रीम होत आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress