#ThackerayTrailer : मीनाताईंच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

#ThackerayTrailer : मीनाताईंच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बाळासाहेंबाची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी करणार असल्याचं चित्र टिझरमधून दिसलं होतं. पण मीनाताईंची भूमिका कोण साकारणार आहे ते जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा येत्या नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय कारकीर्द या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यावर सर्वत्र चर्चा करण्यात आली होती.

बाळासाहेबांच्या आयुष्यात मीनाताई ठाकरेंचं स्थान फारचं मौल्यवान आहे. मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारण्याचं काम अभिनेत्री अमृता राव करणार असल्याची माहिती मिळाली. अभिनेत्री अमृता रावने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मासाहेबांच्या भूमिका करण्याचं काम अमृतानं स्विकारलं असल्यानं ती भूमिकेला योग्य ठरते का हे पाहावं लागेल.

बॉलिवूडच्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयातून बाळासाहेब पाहायला आपल्याला मिळणार आहेत. यासिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दिन सिद्दीकीने बरीच मेहनत घेतली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या वेशभूषेत नवाजुद्दीन सिद्दीकीचा फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते.

सफेद कुर्त्यामध्ये गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, डोळ्यांवरील चष्मा, डोक्यावरील केसांची स्टाईल, हातांची लकब हे सर्व काही बाळासाहेबांसारखंच पाहायला मिळतं. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा कसलेला अभिनेता आहे.

'ठाकरे' सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते संजय राऊत करत आहेत, तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे करत आहेत. 'ठाकरे' या सिनेमातून शिवसेना आणि मनसेची अनोखी युती पाहायला मिळते.

नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे. मार्च 2018पासून सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. 23 जानेवारी 2019ला बाळासाहेबांच्या जन्मदिनी सिनेमा रिलीज करण्याचा मानस आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.

First published: December 26, 2018, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading