मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

काँग्रेस नेत्याच्या मुलाने अभिनेत्री Amisha Patel ला पब्लिकली केले प्रपोज, पोस्ट व्हायरल

काँग्रेस नेत्याच्या मुलाने अभिनेत्री Amisha Patel ला पब्लिकली केले प्रपोज, पोस्ट व्हायरल

Amisha Patel

Amisha Patel

अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel ) हिला एका काँग्रेस नेत्याच्या मुलाने पब्लिकली प्रपोज केले आहे. त्यामुळे बी टाऊनमध्ये त्यांच्या प्रपोजरची चर्चा रंगली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 3 जानेवारी: अभिनेत्री अमीषा पटेल (Amisha Patel ) सध्या ‘गदर 2’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, एका नव्या गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे. तिला एका काँग्रेस नेत्याच्या मुलाने पब्लिकली प्रपोज केले आहे. त्यामुळे बी टाऊनमध्ये त्यांच्या प्रपोजरची चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल याचा नुकताच वाढदिवस साजरा झाला असून तो अमीषाच्या जवळचा मित्र आहे. तिने काही फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

‘हॅपी बर्थ डे माय डार्लिंग फैसल पटेल, लव्ह यू, तुझं वर्ष चांगलं जावो,’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले होते. तिच्या या पोस्टला रिप्लाय देत फैसलने थेट अमीषाला लग्नाची मागणी घातली. पण त्याने ती पोस्ट व्हायरल होताच डिलीट केली. पण शेवटी सोशल मीडिया. त्याच्या या पोस्टचे क्षणात स्क्रिनशॉट व्हायरल होताना दिसत आहेत.

‘थँक्यू अमीषा पटेल. मी तुला पब्लिकली प्रपोज करतोय, तु माझ्याशी लग्न करशील?’असे फैसलने तिच्या पोस्टला रिप्लाय देताना म्हटले आहे. यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. पण याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

तिच्या आणि त्याच्या या पोस्टमुळे दोघांच्या अफेअरची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगली आहे.अमीषा व फैसल हे दोघे अनेकदा स्पॉट झाले आहेत. मात्र, अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, काँग्रेस