मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt: बेबी बम्प आणि प्रेग्नंन्सी ग्लोच्या बातम्यांवर आलियाने दिली सणसणीत रिऍक्शन; म्हणाली...

Alia Bhatt: बेबी बम्प आणि प्रेग्नंन्सी ग्लोच्या बातम्यांवर आलियाने दिली सणसणीत रिऍक्शन; म्हणाली...

आलिया भट्ट आणि तिची प्रेग्नन्सी यावर रोज नवे अपडेट समोर येत असतात. तिच्या बाळाची चर्चा तर सगळीकडेच होताना दिसत असते. यावर आलियाने नुकतंच आपलं मत मांडलं आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 09 ऑगस्ट: नेटकऱ्यांच्या निशाण्यावर रोज हजारो कलाकार असतात. त्यांचे कपडे, लुक, ड्रेसिंग स्टाईल ते अगदी खाजगी आयुष्यापर्यंत अनेक बाबींवर नेटकरी कमेंट कराताना दिसतात. कधी मर्यादेपलीकडे जाऊन सुद्धा कलाकारांवर टीकाटिपणी होते. त्यावर काही कलाकार सडेतोड उत्तर देताना दिसतात. सध्या (alia bhatt baby bump) आलिया भट्ट सुद्धा तिच्या प्रेग्नंन्सीवर येणाऱ्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. आलियाने आई होण्याची बातमी शेअर केल्यापासून तिच्याबद्दल अनेक बातम्या जोर धरताना दिसत आहेत. कधी तिचा बेबी बम्प तर कधी प्रेग्नंन्सी ग्लो यावर बोललं जात आहे. तिच्या सिनेमाविषयी चर्चा करण्याऐवजी केवळ तिच्या प्रेग्नंन्सीला प्रकाशझोतात आणलं जात आहे. तिच्या कपड्यांपासून ते अगदी बाळाची देखभाल ती कशी करणार इथपर्यंत या सगळ्या बातम्यांवर मॅशबल इंडियाशी बोलताना ती असं सांगते, “अरे हा फारच रंजक मामला आहे. नाही मी याचा फारसा फरक पडून घेत नाही. पण मला असं वाटतं की आता त्यांच्याकडे असलेला मजकूर संपला आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी ‘नवविवाहित आलिया’ होते. आता मी प्रेग्नन्ट आहे तर आलियाच्या प्रेग्नंन्सी ग्लो, आलिया बेबी बम्प लपवताना, आलिया बेबी बम्प flaunt करताना असं बरंच काही समोर येत आहे. यावर फक्त मला वाटत की मी काय कपडे घालते, कशी दिसते हा एक खाजगी प्रश्न आहे. आणि यात flaunt करण्यासारखं काय आहे? जे आहे ते ठळक आहे. प्लिज हे सगळं थांबवा.” आलियाला गेले अनेक दिवस कपड्यांवरून बरंच काही ऐकवलं जात आहे. ती प्रेग्नन्ट असताना काय कपडे घालते, कशी दिसते यावर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. तिच्या कामापेक्षाही तिच्या प्रेग्नंन्सी आणि बेबी बम्पबद्दल अधिक रस असल्याचं दिसून आलं आहे. असे शब्द एखाद्या गर्भवती अभिनेत्रीबद्दल वापरले जात असतील तर ते थांबवावं असं तिचं ठाम मत आहे.
सध्या आलिया डार्लिंग्स सिनेमामुळे बरीच चर्चेत आहे. तिच्या या सिनेमाला भरभरून रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे तसच सिनेमाचा विषय, त्यात एक स्ट्रॉंग भूमिका साकरल्याबद्दल तिचं कौतुकही होत आहे.
First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress

पुढील बातम्या