आलियाने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाच्या सेटवरील काही क्षण दाखवणारा आहे. सोबतचं कॅप्शन देत आलियाने आपण या चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं असल्याचं म्हटलं आहे. शिवाय सर्वांकडून या चित्रपटाला प्रेम मिळेल अशी आशाही व्यक्त केली आहे. (हे वाचा:कंगना रणौतचा मोठा निर्णय; अभिनेत्रीनं बदललं आपलं नाव) या व्हिडीओमध्ये आलियाने पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतची झलक दाखवली आहे. जुलैमध्ये आलियाने फोटो शेयर करत आपण या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केल्याचं सांगितलं होतं. अवघ्या दोन ते अडीच महिन्यात चित्रपटाचं शुटींग पूर्ण देखील झालं आहे. आत्ता आलियाच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. (हे वाचा: पारंपरिक साडी, नाकात नथ' पाहा धकधक गर्लचा मराठमोळा साजशृंगार ) या चित्रपटाद्वारे आलिया निर्मातीदेखील बनली आहे. निर्माता म्हणून आलियाचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आलियाचा सहनिर्माता आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबत अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री शेफाली शहा दिसून येणार आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood actress