Home /News /entertainment /

पॉर्न व्हिडीओ दाखवून करायचा अत्याचार, अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर बलात्काराचा आरोप

पॉर्न व्हिडीओ दाखवून करायचा अत्याचार, अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर बलात्काराचा आरोप

आयुष तिवारी याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष देऊन दोन वर्ष तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे.

    मुंबई, 30 नोव्हेंबर : बॉलिवूड (Ayush Tiwari) आणि वेब सीरिजमध्ये (web series actress) काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने दिग्दर्शकावर बलात्काराचा (Rape) आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कास्टिंग दिग्दर्शक आयुष तिवारी याच्याविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप आयुष तिवारी याने पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणी गर्भवती राहिली होती, पण त्याने लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पीडित तरुणीने 25 नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये (Versova police) तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'कारभारी लयभारी'मध्ये हंगामा; प्रियांकाच्या चुकीमुळे वीरूला मार खावा लागणार वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आयुष तिवारी याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष देऊन दोन वर्ष तिच्यावर बलात्कार केला. आरोपी आयुष तिवारीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 'पॉर्न व्हिडीओ दाखवून आयुष आपल्यासोबत अत्याचार करत होता. तसंच तो व्हिडीओ कॉल करून आणि आपल्या गुप्तांगाचे फोटोही पाठवत होता. माझी प्रकृती अचानक बिघडली. उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे तपासणी केली असता प्रेग्नट असल्याचे समोर आले. त्यानंतर आयुष याला याबद्दल सांगितले असता त्याने माझ्या चारित्र्यावरच संशय घेऊन मारहाण केली'. गुंडाच्या साथीदाराची मुजोरी, वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून नेले फरफटत, VIDEO पीडित तरुणीने याबद्दल आपल्या भावाला माहिती दिली. त्याने आयुष तिवारीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये भांडण झाले. या घटनेनंतर आरोपी आयुष तिवारी पीडितेला भेटण्यास नकार देत होता. अखेर पीडितेने वर्सोवा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या