मुंबई, 23 आक्टोबर: अभिनेत्री दिशा पाटनीचं नाव सध्या चर्चेत आहे. सध्या ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. टायगर श्रॉफ नेहमी स्टंट करताना दिसून येतो आता त्याच्या पाठोपाठ दिशाला स्टंटचं वेड लागलंय. टायगर श्रॉफच्या पावलांवर पाऊल ठेवत दिशा पाटनीसुद्धा अॅक्शनच्या रिंगणात उतरली आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात ती स्टंट करताना दिसत आहे.
सध्या दिशा सलमानच्या भारत चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. भारत सिनेमामध्ये दिशा राधेची भूमिका साकारणार आहे. ज्यात सलमान खान भारतच्या मुख्य भूमिकेत असेल.
चित्रपटात दिशा सलमानची मुलगी असल्याचा अभिनय करणार आहे. भारत सिनेमात ती अॅक्शन करताना दिसणार आहे. ‘भारत’ सिनेमाच्या अॅक्शनसाठी दिशा ही तयारी करत आहे. भारत सिनेमात सलमानसोबत जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, तब्बू, दिशा पाटनी, सुनिल ग्रोव्हर यांसारखे मोठे कलाकारसुद्धा दिसणार आहे. 2019 मध्ये ईदला भारत सिनेमा प्रेश्रकांच्या भेटीला येणार आहे.
PHOTOS टायगर श्रॉफशी झालेल्या ब्रेकअपनंतर दिशा कुठे होती गायब?