बाॅलिवूड अभिनेत्री श्यामा यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन

श्यामा यांचं खर नाव 'खर्शीद अख्तर' असं होतं.'आर पार' (1954), 'बरसात की रात'(1960), आणि 'तराना' अशा अनेक सिनेमांमधून श्यामा यांनी भारतीय सिनेसृष्टी आपली एक वेगळीच छबी उमटवली होती.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2017 05:03 PM IST

बाॅलिवूड अभिनेत्री श्यामा यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन

14 नोव्हेंबर : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा यांचं आज निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या.श्यामा यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ पाडली होती.

श्यामा यांचं खर नाव 'खर्शीद अख्तर' असं होतं.'आर पार' (1954), 'बरसात की रात'(1960), आणि 'तराना' अशा अनेक सिनेमांमधून श्यामा यांनी भारतीय सिनेसृष्टी आपली एक वेगळीच छबी उमटवली होती.

श्यामा यांचा जन्म 7 जून 1935 मध्ये ब्रिटिश इंडियाच्या लाहोरमध्ये झाला होता.  1953 ला त्यांचं लग्न दिग्दर्शक फली मिस्त्री यांच्यासोबत झालं. त्या आपला संसार सांभाळत सिनेसृष्टीत टिकून राहिल्या.मुंबईला येऊन त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि यशस्वी प्रवास केला.

1950 आणि 1960 दशकाच्या दरम्यान श्यामा या भारतातल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण आज आपल्या यशस्वी प्रवासाला पूर्णविराम देत त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...