S M L

मालमत्तेच्या वादावरून निरूपा राॅयच्या मुलांमध्ये उभी राहिली 'दिवार'

निरूपा रॉय यांचं नेपियन्सी रोडवर 3000 स्क्वेअर फुटाचं आलिशान घर आहे. याशिवाय या घराबाहेर मोठी बागही आहे. मात्र या घरावर नक्की ताबा कुणाचा यावरून योगेश आणि किरण या त्यांच्या दोन भावांमध्ये भांडण आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jan 11, 2018 05:16 PM IST

मालमत्तेच्या वादावरून निरूपा राॅयच्या मुलांमध्ये उभी राहिली 'दिवार'

11 जानेवारी : बॉलिवूडची माँ निरूपा रॉय यांचं मुंबईतील आलिशान घर त्यांच्या दोन मुलांच्या नात्यात 'दिवार' उभी करायला कारणीभूत ठरलंय. या निरूपा रॉय यांचं नेपियन्सी रोडवर 3000 स्क्वेअर फुटाचं आलिशान घर आहे. याशिवाय या घराबाहेर मोठी बागही आहे. मात्र या घरावर नक्की ताबा कुणाचा यावरून योगेश आणि किरण या त्यांच्या दोन भावांमध्ये भांडण आहे.

याच भांडणातून योगेश याने किरण राहत असलेल्या घरी दारूच्या नशेत तोडफोड केल्याची घटना घडलीय. तब्बल 20 मिनिटं हा वाद सुरू होता. अखेर योगेशने स्वतःला सावरत आपलं घर गाठलं. या मालमत्तेच्या वादावरून त्यांनी यापूर्वीच कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय.

निरूपा राॅय यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये आईच्या भूमिका गाजवल्या. पडद्यावरच्या अनेक मुलांना त्यांनी मातृप्रेमाचे धडे दिले. पण त्यांच्याच स्वत:च्या मुलांनी अशा पद्धतीनं वागावं, ही मोठी शोकांतिका आहे. निरूपा राॅय यांचं निधन 2004मध्ये झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close