मुंबई, 29 ऑगस्ट : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांनंतर जेनेलिया देशमुखच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला होता. तीन आठवड्यांपूर्वी जेनेलियाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 21 दिवसांनी चाचणी केल्यावर निगेटीव्ह आल्याची माहिती जेनेलियानं ट्वीट करून आपल्या चाहत्यांना दिली आहे.
21 दिवसांपूर्वी रितेश देशमुखच्या पत्नीला म्हणजेच जेनेलिया देशमुखला कोरोना झाला होता. त्यांनी स्वत:ला तीन आठवडे क्वारंटाइन केलं होतं. कुटुंबात 21 दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर परतण्याचा आनंद खूप मोठा असल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे आहे.
'देवाच्या कृपेनं कोरोनाचा रिपोर्ट 21 दिवसांनंतर निगेटिव्ह आला आहे. तुमच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादानं लवकर बरी झाले. 21 दिवस क्वारंटाइन राहाणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. आपल्यावर प्रेम करणारी माणसं आणि कुटुंब हे आपली ऊर्जा, क्षमता वाढवण्यासाठी कायम मदत करत असतात. मी कोरोनाला हरवून पुन्हा माझ्या कुटुंबासोबत आले याचा मला आनंद असल्याचं', जेनेलियानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.