अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन

अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन

  • Share this:

27 एप्रिल : अभिनेते विनोद खन्ना यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते.

विनोद खन्ना हे गेल्या महिन्यांपासून कर्करोगानं त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना डिहाइड्रेशनचा त्रास होत होता. घरी उपचार चालू असताना प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतरही त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

6 आॅक्टोबर 1946 रोजी त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब पेशावरहून मुंबईत आलं.

रोमँटिक, देखणा अभिनेता म्हणून विनोद खन्ना बाॅलिवूडमध्ये लोकप्रिय होते. या रोमँटिक अभिनेत्याची सुरुवात मात्र झाली होती ती खलनायक म्हणून.  1968मध्ये 'मन का मीत'मध्ये त्यांनी छोटीशी खलनायकाची भूमिका केली होती. आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

त्यांचा 'मेरे अपने' सिनेमातला अँग्री यंग मॅन, 'मेरा गाँव मेरा देस'मधला खलनायक, 'अचानक'मधला लष्करी अधिकारी जास्त गाजले. अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, शानसारख्या सिनेमांतून इतर अभिनेत्यांसोबतही त्यांनी स्वत:ची वेगळी छाप पाडली.

Loading...

अगदी अलिकडचे दिलवाले, दबंग, दबंग 2 सिनेमे होते. त्यातली त्यांची भूमिकाही लक्षात राहणारी ठरली.

विनोद खन्ना यशाच्या शिखरावर असतानाच ते ओशो रजनीश यांचे भक्त बनले. आणि 5 वर्ष त्यांनी बाॅलिवूडला रामराम ठोकला होता. त्यानंतर बाॅलिवूडला परतल्यावर त्यांनी इन्साफ आणि सत्यमेव जयते हे हिट सिनेमेही दिले.

अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास झाला. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. पंजाबच्या गुरुदासपूरमधून ते खासदार होते.  संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयात ते मंत्री होते.

तसंच 2001 ते 2005 या कालावधीत ते एफटीआयचे अध्यक्षही होते. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक राणी ऐसी भी’चा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला होता. बिग बी अमिताभ बच्चन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र प्रकृती बिघडल्याने विनोद खन्ना हजर राहू शकले नव्हते.

एका देखण्या अभिनेत्याला प्रेक्षक कायमचाच मुकलाय. त्यांच्या सिनेमांमुळे रसिक मनावरचं त्यांचं राज्य कायमच राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 12:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...